मुंबई : बदललेली जीवनशैली, प्रदूषण, तणाव यामुळे लोक वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागतात. याशिवाय काही गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरील तेज नष्ट करतात. त्याला तुमच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. पाहुया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा मोठे दिसता...


उशीवर तोंड ठेवून झोपणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. कारण पोटावर झोपल्याने चेहरा उशीवर येतो. म्हणून उशीवर तोंड नाही डोकं ठेवून झोपा.


पाणी कमी पिणे


पाणी कमी प्यायल्याने लोक वयापेक्षा वृद्ध दिसू लागतात. डॉक्टर देखील दिवसातून कमीत कमी तीन लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. ऑफिसमध्ये काम करताना डेस्कवर पाण्याची बॉटल ठेवा. मधून मधून पाणी पित रहा.


नशा करणे


जर खूप जास्त प्रमाणात धुम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर तुम्ही वयापेक्षा नक्कीच मोठे दिसाल. या सगळ्या सवयी सोडल्यास त्वचा हेल्दी होईल आण तुम्ही तरुण व्हाल.


सनस्क्रीम लोशन लावणे


उन्हाळा असो किंवा हिवाळा सनस्क्रीम लावायला अजिबात विसरु नका. सतत उन्हात राहूनही तुम्ही जर सनस्क्रीम लावत नसाल तर तुम्ही वयापेक्षा मोठे दिसाल.


खूप गोड खाणे


तुम्हाला गोड खूप आवडते का? मग जरा सांभाळूनच. कारण गोडाच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर वय दिसू लागते. त्याचबरोबर वजन वाढणे, मधुमेह, हृदयरोग, पिंपल्स आणि सुरकुत्या या समस्यांना सामोरे जावे लागते.


झोप पूर्ण न होणे


काही लोकांना उशिरा झोपण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. प्रत्येकाला ७-८ तास झोपेची गरज असते. अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्याबरोबरच चेहऱ्यावरही दिसू लागतो. झोप पूर्ण न झाल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात आणि तुम्हाला थकवा जाणवतो.