मुंबई : क्लीन शेव करण्यासाठी किंवा शरीरावरील केस काढण्यासाठी बहुतांशवेळा रेझरचाच उपयोग केला जातो. शरीरातील इतर भागांतील केस काढण्यासाठी हेअर रिमूवल क्रीम किंवा इतर केमिकल प्रोडक्टपेक्षा रेझरचा उपयोग सुरक्षित असतो. पण चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार जडवू शकतो. यामध्ये काही त्वचेसंबंधी असतील तर काही गंभीरही असू शकतील.


त्वचा इन्फेक्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेजरचा उपयोग ब्लेड बदलून एकापेक्षा अधिकवेळा केला जातो. रेझर ओलं राहिल्यास किंवा ते व्यवस्थित साफ न झाल्यास त्यामध्ये सूक्ष्म किटाणू जमा होतात. पुढच्या वेळेस वापरताना धुवल्यानंतरही ते जात नाहीत. यामुळे फंगल किंवा यीस्ट इंफेक्शन होण्याची शक्यता असते. यातून वाचण्यासाठी रेझरचा वापर करुन झाल्यावर प्रत्येकवेळेस स्वच्छ धुवून सुकवायला हवं. असं न केल्यास तुम्ही वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि वायरल इन्फेक्शनच्या विळख्यात येऊ शकता.


फॉलिक्युलाइटिस 


दुसऱ्याने वापरलेलं रेजर वापरल्यास फॉलिक्युलाइटिस आजाराचा धोका असतो.  फॉलिक्युलाइटिस झाल्यास तुमच्या शरीरावर रॅशेस दिसून त्यातून मऊ पदार्थ बाहेर येतो. रेशेस पूर्णपणे निघून जाईपर्यंत शेव्हींग करु नये. याकडे दुर्लक्ष केल्यास चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.


एमएसआरए 


एमएसआरए हे एक गंभीर स्किन इंफेक्शन असून यामुळे जीवही जाऊ शकतो. एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांसोबत रेझर शेअर केल्याने हा आजार जडू शकतो. यामध्ये त्वचेला सूझ येते आणि त्वचा लाल होते. एमएसआरएमूळे तुम्हाला तापही येऊ शकतो.


फोड आणि डाग 


रेझर शेअर करण्याने आणि वापरानंतर न धुतल्यास किंवा किटाणुनाशकचा वापर न केल्यास त्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामधलं स्‍टाफीलोकोकस इंफेक्‍शन सामान्य असतं. स्किन इन्फेक्शन हे रेझरच्या चुकीच्या वापरामूळे होतं. यामुळे चेहऱ्यावर फोड आणि डाग दिसू लागतात.


हेपेटाइटिस


रेझर वापरल्यानंतर किंवा वापरानंतर गरम पाण्याने धुणे गरजेचे आहे. रेझर, शेव्हींग ब्रश कोणासोबत शेअर करु नका. कोणत्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तिसोबत हे शेअर केल्यास तुम्हालाही ते होण्याची शक्यता जास्त असते. हेपेटाइटिसच्या रुग्णांसोबत रेझर किंवा ब्लेड शेअर केल्यास तुम्हालाही हा त्रास उद्भवू शकतो.