हिवाळ्यात चेहऱ्याची `अशा प्रकारे` घ्या काळजी!
सर्दीत थंड वाहणारा वारा त्वचेला जास्त नुकसान पोहचवतो
मुंबई: सर्दीमध्ये आपल्याला चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण सर्दीत थंड वाहणारा वारा त्वचेला जास्त नुकसान पोहचवतो. या नैसर्गिक उपचार केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहील. तुमच्या त्वचेला सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे उपचार करु शकता.
सर्वात प्रथम चेहरा स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्याला कपड्याने जोर लावून साफ करण्याची गरज नाही. चेहरा साफ करण्यासाठी क्लींजिंग ऑईलने किंवा फेस ऑईलचा वापर करा. यासाठी ओलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल यांच एकत्र मिश्रण करुन गरम होईपर्यंत हातावर रगडून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ओला कपडा करुन ओला त्या कपड्यातून पाणी काढून घ्या आणि चेहऱ्यावर ठेवा. थोड्या वेळाने कपडा बाजूला काढा. असे केल्यास त्वचेवरील चमक कायम राहते.
संत्र्याच्या सालदेखील चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. संत्र्याच्या साल चांगले वाळवून त्याची पावडर तयार करुन घ्या. त्यानंतर ही पावडर साखरेच्या गरम पाण्यात मिसळून घ्या. तयार झालेली पेस्ट चेहऱ्य़ावर लावून ठेवा. १०-१५ मिनिटे झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या. याने खराब त्वचा निघून जाते. या उपचारांमुळे आपण आपली त्वचा हिवाळ्यातही चांगली आणि टवटवीत राहू शकते.