मुंबई : दुखापत ही काही केवळ खेळाडूंनाच होत नाही. जर तुम्ही वॉर्मअपशिवाय व्यायाम करत असाल तर तुम्हालाही दुखापत होण्याची शक्यता असते. घरी किंवा जिममध्ये व्यायाम किंवा स्पोर्ट्स अक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप आणि संपल्यानंतर रिलॅक्स होणं फार गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्म-अपमुळे शरीरातील लवचिकता आणि संतुलन वाढतं आणि रिलॅक्स केल्याने स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय यो दोन्ही गोष्टींमुळे दुखापतीचा धोका टळतो.


या गोष्टींची काळजी घ्या


जर तुम्हाला वर्कआऊटदरम्यान दुखापत झाली तर तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली म्हणजे शेक घेणं. दुखापत झाल्यानंतर लगेचच बर्फ लावा. यामुळे सूज येत नाही. यावेळी गरम पाण्याने शेक घेऊ नका. 


दुसरं म्हणजे, रुग्णाला अधिक विश्रांती द्या. दुखापत झालेल्या जागेची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्या. तर तिसरं, दुखापत झालेल्या ठिकाणी रुग्णाला क्रेपबँडने बांधलं पाहिजे जेणेकरून हाड हलणार नाही. हाडांची हालचाल होताना वेदनेसह सूज वाढेल.


उपचार आणि रिकव्हरी


वर्कआऊटदरम्यान झालेली स्पोर्ट्स एंजरीमध्ये रिकव्हर होण्यासाठी 3-4 महिने लागतात. यावेळी काहींना संपूर्ण रिकव्हरीसाठी 6-7 महिनेही लागू शकतात. सौम्य जखमांवर औषधाने उपचार केले जातात आणि त्यापेक्षा जास्त गंभीर जखमांवर औषधं आणि फिजिओथेरपीद्वारे उपचार केले जातात.