11 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या `या` अभिनेत्रीची स्किन अगदी बेबी सॉफ्ट; काय आहे तिचं ब्युटी रूटीन
दिव्या खोसला सांगते की, स्किन केअर व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची चमक वाढते.
मुंबईः आपली स्कीन सुंदर असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी महिला पार्लरला जाण्यापासून अनेक घरगुती उपाय करत असतात. मात्र अभिनेत्री दिव्या खोसला कुमारनं तिच्या सौंदर्याचं गुपित शेअर केलं आहे.
अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका दिव्या खोसलाचं सौंदर्य पाहता ती 11 वर्षांच्या मुलाची आई यावर विश्वास बसणार नाही. दिव्याची त्वचा लहान बाळाच्या त्वचेसारखी मखमली आणि गुलाबी आहे. तिच्यासारखी त्वचा फार कमी बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दिसेल. दिव्या सांगते की, स्किन केअर व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची चमक वाढते.
दिव्याला पार्लरमध्ये जाणे आवडत नाही, त्वचेच्या काळजीसाठी ती जे काही करते ते फक्त आणि फक्त घरगुती गोष्टी. गेल्या काही वर्षांपासून ती मेडिटेशन करत आहे. त्यामुळे त्यांची त्वचा बर्याच प्रमाणात निरोगी राहण्यास मदत होते. मेकअपमुळे जितके सौंदर्य वाढते तितकेच ते बिघडते. म्हणूनच वेळीच मेकअप काढून टाकणंही महत्वाचं आहे. मेडिटेशनमुळे ताणही दूर होतो. ताण घेतल्याने अकाली म्हातारपण सुद्धा येतं.
अनेक अभिनेत्री हेल्दी त्वचेसाठी डाएट करतात. मात्र, दिव्याला डाएट करणं आवडत नाही. तिला वाटतं की याचा सर्व परिणाम त्वचेवर होतो. तिला जे खावसं वाटेल तेव्हा ती खाते.
नैसर्गिक गोष्टींचं महत्व खूप असल्याने आहारापासून फेशियलपर्यंत सगळीकडे नैसर्गिक वस्तूंचा वापर करत असल्याचं दिव्या सांगते