Beer For Shiny Hair: बिअर (beer) पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते यात काही शंका नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, हीच बिअर केसांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी बिअरचे नेमके कोणते फायदे आहेत याबद्दल माहीती सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिअर फक्त ग्लासमध्ये घेऊन पिण्यासाठी नाही, तर केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी ठरते. (Beer For Shiny Hair)


केस (hair) चमकदार, मजबूत आणि लांब असावेत म्हणून तरूणी, महिला खूप काळजी घेत असतात. त्यातच त्यांना आता एक नवा उपायही मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.


बिअरच्या वापराने केसांची वाढ चांगली होते. पण बिअर कशी वापरायची (beer for hair) आणि केसांसाठी कोणती बिअर निवडायची ते एकदा जाणून घ्या....


बिअरमध्ये व्हिटॅमिन (vitamin B) बी चं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत होते. माल्ट (malt) आणि हॉप्स (hops) हे घटक बिअरमध्ये आढळणारे खराब झालेले केस चांगले करण्यास मदत करतात. यासोबतच सुक्रोज आणि माल्टोज शर्करा केसांच्या क्युटिकल्सला मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी उपयोगी ठरते.


अनेकजण शॅम्पू बनवण्यासाठी बिअरचा वापर करतात. बाजारात तुम्ही बघितलेच असेल, तर अनेक प्रकारचे बिअर शॅम्पू उपलब्ध आहेत. बिअरचा वापर डी-कार्बोनेटेड कंडिशनर म्हणून केला जातो. हे खराब झालेले केस दुरुस्त करण्यास आणि केस दाट होण्यास मदत करते. बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या हॉप्समध्ये सिलिका असते जे केसांची वाढ आणि चमक यासाठी फायदेशीर असते.