मुंबई : वजन कमी करण्यासोबतच पोटाची चरबी कमी करणं खूप कठीण काम आहे. पोटाभोवती चरबीचा हा घेर जास्त कॅलरी अन्न, जास्त साखर, कार्बोहायड्रेट्स आणि पॅकेज अन्नपदार्थ खाण्यामुळे होऊ शकतो. ते कमी करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत घेतात, पण एवढं करूनही पोट कमी होत नाही. तुमचंही बेली फॅट काही केल्या कमी होत नाहीये तर यामागे काही संभाव्य कारणं असू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यायाम केल्यानंतरही पोटाची चरबी का कमी होत नाहीये, जाणून घ्या


ताणतणाव


जर तुम्ही ताण घेतला तर पोटाची चरबी कमी होण्यामध्ये अडचण होऊ शकते. कारण तणावामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोनचा फ्लो होतो. 2012 च्या अभ्यासानुसार, हे हार्मोन तुमची चयापचय क्रिया मंद करू शकतात. अशा प्रकारे कमी कॅलरीज बर्न होतात आणि लठ्ठपणा वाढतो.


पार्टी करणं


प्रत्येकाला पार्टी करायला आवडते. कारण पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता आणि अनेक गोष्टी करता. पण जर तुम्ही पार्टीदरम्यान जास्त मद्यपान केलं तर वजन वाढू शकतं. परिणामी यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो


चुकीचा व्यायाम


फक्त कार्डिओ व्यायामाने पोटाची चरबी कमी करणं अवघड आहे. हे कमी करण्यासाठी, आपण योग्य व्यायाम करावा. अहवालानुसार, आठवड्यातून 250 मिनिटे मोडरेट एक्सरसाइज आणि 125 मिनिटे हाई इंटेसिटीचा व्यायाम केल्यास त्वरित परिणाम दिसून येतो.