Belly Fat: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजार तुमच्या मागे लागण्याची शक्यता असते. अशा जीवनशैलीमुळे सहाजिकच तुमचं वजन वाढण्याची शक्यता दाट असते. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आपण डाएट आणि एक्सरसाइजची मदत घेतो. मात्र असं असूनही अनेकदा वजन कमी होताना दिसत नाही. याला काही गोष्टी कारणीभूत ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर डाएट आणि एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही खास टीप्सचा वापर केला पाहिजे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या टीप्सचा वापर करू शकता ते पाहूया. 


बेली फॅट कमी करण्याच्या सोप्या टीप्स कोणत्या आहेत?


गोड पदार्थांचं कमी सेवन 


आपल्यापैकी अनेकांना गोड खायला प्रचंड आवडतं. जर तुम्हाला गोड पदार्थ जास्त आवडत असतील तर ते केवळ लठ्ठपणाच नाही तर मधुमेह आणि हृदयाचे आजारयांसारख्या गंभीर आजारांचं कारण बनू शकतात. शिवाय गोड पदार्थांमुळे तुमच्या शरीरात फॅट्स वाढतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारातून गोड पदार्थाचं प्रमाण कमी केलं तर हळूहळू पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. 


ओव्याचं पाणी प्या


बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. हे वजन कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे पचनकार्य देखील सुधारतं. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ओव्याचा वापर करायचा असेल तर एक चमचा ओवा पाण्यात भिजवून रात्रभर भांड्यात ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात थोडं मध टाकून हे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.


ओव्हरइटिंग करू नका


काही लोकं त्यांच्या भूकेपेक्षा अधिक खातात. अशा खाण्याची सवय फार वाईट असते. एकावेळी जास्त आहार घेतल्याने पोटाची चरबी वाढू लागते. 2 ते 3 तासांच्या अंतराने खाल्ले तर पचनक्रियाही सुरळीत होते. यासोबतच पाणी नियमित पिणं गरजेचं आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)