Belly Fat Loss: वजन कमी (Weight loss) करणं काही सोपं काम नाही. वजन कमी करण्याच्या सर्व प्रक्रिया वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने काम करतात. शिवाय प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्या देखील असतात. बर्‍याच लोकांच्या पोटावर चरबी झपाट्याने जमा होते. पोटावरील चरबी कमी करणं फार कठीण काम असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात पोटाभोवती चरबी जमा होणं हे सर्वात सामान्य आहे. मात्र तुम्हाला माहितीये का लाईफस्टाईलमध्ये लहान बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. शरीराचा कोणत्याही भागात आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन कमी करता येतं. तर जाणून घेऊया बेली फॅट कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतात.


इंटरमिटेंट फास्टिंग


इंटरमिटेंट फास्टिंग करणं म्हणजे विशिष्ट वेळेतच खाणं. हे उपवासाच्या इतर सर्व प्रकारांपेक्षा खूप वेगळं आहे. जर हे फास्टिंग नीट पाळलं गेलं तर वजन कमी करण्यात खूप मदत होते. कारण अशा प्रकारे खाल्ल्याने कॅलरीज कमी होतात.


हाई इंटेंसिटी ट्रेनिंग


हाई इंटेंसिटी ट्रेनिंग हा एक असं ट्रेनिंग आहे ज्यामध्ये कार्डियोवेस्कुलर एक्सरसाइजज सोबत इंटेन्स एनारोबिक एक्सरसाइज करण्यात येतो. व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय पुन्हा वजन वाढण्याची शक्यताही कमी होते.


कमीत कमी साखरेचं सेवन


आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नाही की आपण जे पॅक केलेले पदार्थ आणि पेये घेतो त्यात साखर आणि कॅलरीज जास्त असतात. 'डाएट' फूड्स असल्याचा दावा करणाऱ्या पदार्थांमध्येही भरपूर साखर असते. त्यामुळे आरोग्याला उपयुक्त असणारे  पदार्थ निवडावे, ज्यामध्ये साखर आणि कॅलरीजचं प्रमाण कमी आहे.