Belly Fat Loss : चुकीची लाईफस्टाईल (Wrong Lifestyle) आणि व्यायामाच्या अभावामुळे (Lack of exercise) आजकाल बेली फॅट (Belly Fat) वाढणं ही एक मोठी समस्या बनलीये. आजकाल लहान मुलंही लठ्ठपणाची (Obesity) शिकार होताना दिसतात. हा लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, दमा, गॅस्ट्रिक यासह अनेक आजारांना निमंत्रण देतो. म्हणून, शक्य तितक्या लवकर, आपण स्वत:ला या वजन कमी करण्यापासून दूर केले पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला लठ्ठपणा दूर करण्याचे 4 सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही चरबी वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.


जिऱ्याचं पाणी 


पोटाची चरबी कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. हे पाणी detoxifying तत्वांनी समृद्ध मानलं जातं. तुम्ही जिऱ्याचं पाणी सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी प्या. असं केल्याने पोटाची चरबी कमी होऊ लागते आणि शरीराची प्रतिकारशक्ती जास्त वाढते.


अजवाइन चहा हा देखील एक चांगला पर्याय आहे


शरीराचे वजन कमी करण्यासाठी अजवाइन चहा हा एक उत्तम पर्याय आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अजवाइन चहाचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो. सर्दी आणि तापाच्या बाबतीतही याचे सेवन फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांवर आराम मिळतो.


सकाळी आणि संध्याकाळी एक कप ग्रीन टी प्या


पोटाची वाढती चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीची पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये असे घटक असतात, जे चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप ग्रीन टी पिऊ शकता. हा ग्रीन टी तुम्हाला शुगर, डायबिटीज आणि हाय बीपी यांसारख्या अनेक आजारांपासून संरक्षण देतो.


बडीशेप मेथीही उपयुक्त 


या उपायांव्यतिरिक्त, तुमच्या स्वयंपाकघरात असलेली मेथी, जिरं आणि बडीशेप देखील पोटाची चरबी कमी करण्यात खूप मदत करते. या गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्याने वाढलेलं पोट नियंत्रणात येतं आणि वजन झपाट्याने कमी होतं. असं मानलं जातं की, हा चहा प्यायल्याने शरीराला खूप फायदा होतो आणि अपचनाची समस्या दूर होते.