मुंबई : वाढत्या वजनाचा लोकांना फार त्रास होतो. योग्य वजन नियंत्रित (Weight control) करण्यासाठी लोक आजकाल विविध पद्धतींचा अवलंब करताना दिसतात. आहारावर (Diet) नियंत्रण ठेवण्यापासून ते जिममध्ये तासनतास वर्कआउट (Workout) करूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. लोक काही दिवस जिममध्ये (Gym) व्यायाम करतात आणि त्यानंतर कंटाळा करत जीम सोडून देतात. पण तुम्हाला माहित आहे की वजन कमी करण्यासाठी जिममध्ये व्यायाम करणं आवश्यक नाही तर तुम्ही नियमित चालण्यानेही वजन नियंत्रित करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी, चालण्याची वेळ आणि तीव्रता आणि आहार खूप महत्वाचा आहे. शारीरिक हालचाल करून आणि कॅलरीज (Calories burn) कमी करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. 


मुळात चालणं ही एक अशी क्रिया आहे जी सहजपणे कॅलरी बर्न करते. जर तुम्ही दररोज अर्धा तास वेगाने चालत असाल तर तुम्ही वजन सहज नियंत्रित करू शकता. एका दिवसात 30 मिनिटं चालून तुम्ही सुमारे 150 कॅलरीज बर्न करू शकता. 


पायी चालण्याने कशी कराल कॅलरी बर्न?


तुम्ही नियमित चालत जाऊनही वजन कमी करू शकता. नियमित चालण्याने शरीराला खूप फायदा होतो. जर्नल ऑफ एक्सरसाइज न्यूट्रिशन अँड बायोकेमिस्ट्रीमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, तुम्ही दररोज चालता त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. सतत चालण्याने पोट आणि कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते.


या प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, महिलां एकूण 12 आठवडे दर आठवड्याला 3 दिवस 50-70 मिनिटं पायी चालल्या. अभ्यासानंतर, त्यांना आढळले की सहभागींनी सरासरी 1.5% शरीरातील चरबी आणि कंबरेभोवती 1.1 इंच फॅट बर्न झाल्याचं लक्षात आलं.