मुंबई : तुम्ही वजन की करताय? आतापर्यंत वजन कमी करण्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टींचा वापर केला असेल. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कमी जेवतात किंवा उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता, परंतु कमी खाणं किंवा उपाशी राहणं यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर तुमच्या शरीरातील हाडंही कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकता. आपण आपल्या आहारात कोणती फळे समाविष्ट केली पाहिजेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


किवी


जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही किवी हे फळ खाऊ शकता. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. शिवाय किवीच्या बिया पचनास मदत करतात. त्याच वेळी, किवीच्या हिरव्या भागामध्ये फायबर आढळतं. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. 


सफरचंद


सफरचंद पोटाची चरबी कमी करण्यात मदत करू शकतं याची फार कमी लोकांना माहिती आहे. सफरचंदात भरपूर फायबर आढळतं ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होतं. याशिवाय रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही इतर आजारांपासून दूर राहता.


पपई


पपईचं सेवन केल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.


(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)