Belly Fat : चुकीची जीवनशैली ( Wrong Lifestyle ) आणि अवेळी आहार ( Diet ) यामुळे आपल्या शरीरात चरबी ( Fat ) म्हणजेच फॅट वाढू लागतं. दरम्यान बेली फॅट ( Belly Fat ) वाढलं की, ते दिसायला ही वाईट दिसतं. मात्र तुम्हाला माहितीये का? पोटाच्या चरबीमुळे तुम्हाला केस गळतीची समस्या देखील जाणवू शकते. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये काही संबंध नाहीये. मात्र काही संशोधनांप्रमाणे, पोटाजवळची वाढलेली चरबी केसांची होणारी गळती ( Hair Fall ) यांच्यामध्ये संबंध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसगळतीची अनेक विविधं कारणं असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता, हार्मोन्सचं असंतुलन, तणाव किंवा इतर काही वैद्यकीय परिस्थिती यासारखे विविध घटकांचा समावेश असू शकतो. 


बेली फॅट ( Belly Fat ) शरीरातील इतर प्रकारच्या फॅटपेक्षा जास्त इस्ट्रोजेन तयार करण्यासाठी ओळखलं जातं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढणं हे केस गळतीशी संबंधित असतं. इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी बिघडल्यानंतर टेस्टोस्टेरॉन सारख्या एंड्रोजनचं उत्पादन कमी होतं. 


मुख्य म्हणजे केसांच्या वाढीसाठी एंड्रोजन महत्वाचं असून याच्या कमतरतेमुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.


या कारणांमुळे वाढतं बेली फॅट ( Belly Fat )


साखरयुक्त पेयं


साखरयुक्त पेयं किंवा सोडा हे पोटाची चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं. एका अभ्यासानुसार, शुगरी ड्रिंक्समुळे 70 टक्क्यांपर्यंत पोटाचा घेर वाढू शकतो. 


पाणी पिण्याची सवय


उभं राहून पाणी प्यायल्याने देखील पोटाचा घेर ( Belly Fat ) वाढू शकतो, असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही शांत बसून पाणी प्यायलं पाहिजे.


रात्रीचं जेवणं टाळणं


वजन कमी करण्यासाठी काही लोकं रात्रीचं जेवण टाळतात, मात्र असे केल्याने पोटाजवळ चरबी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. 


बेली फॅट कमी करण्यासाठी प्या हे ड्रिंक


तुम्हाला वजन म्हणजे बेली फॅट ( Belly Fat ) कमी करायचं असेल तर तुमच्या शरीरात हार्मोन्स संतुलित असणं फार गरजेचं असतं. बेली फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही एका खास ड्रिंकचा वापर करू शकता. यामध्ये 1 कप कच्चा पांढरा पेठा, 1/4 चमचा भाजलेलं जिरं पावडर, 1/4 टीस्पून काळी मिरी, 1/4 चमचा काळं मीठ, 1/4 चमचा काळी मिरी आणि पाणी घालून सर्व गोष्टी मिक्सरमध्ये ब्लेंड करा. हे ड्रिंक जर तुम्ही दररोज प्यायलात तर वजन कमी होण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं.