मुंबई : अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित १० दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- अंजीरमध्ये तंतूमय पदार्थाचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. तंतूमय पदार्थ पोट साफ करण्यास मदत करतात.


- आपलं शरीर सहजरित्या प्रत्येक आजाराचा सामना करु शकत नाही. अंजीरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे आजारांपासून रक्षण होतं.


- अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. 


- अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते. 


- ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात.