मुंबई : बेबी पावडरमुळे लहान मुलांची त्वचा कोमल राहते. बेबी पावडरचा वापर शक्यतो लहान मुलांसाठी केला जात असला तरी याचे इतर अनेकही फायदे आहेत. जाणून घ्या या बेबी पावडरचे ५ फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायाला सतत घाम येत असेल तर चप्पल अथवा बुटांमध्ये थोडीशी बेबी पावडर टाका. यामुळे पायांना घाम घेणार नाही. तसेच दुर्गंधीही येणार नाही.


केस तेलकट झालेयत आणि तुमच्याकडे शाम्पू करण्यासाठी वेळ नाहीये तर बेबी पावडरचा तुम्ही वापर करु शकता. यावेळी कंगव्यावर थोडीशी बेबी पावडर घेऊन केस विंचरला. केसांमधील अतिरिक्त तेल निघून जाईल. 


दागिने एकत्र ठेवल्यास ते गुरफटून जातात. यावेळी त्यांना वेगळे करताना दागिने तुटण्यासाठी भिती असते. अशावेळी बेबी पाडवरचा वापर करा. 


तुमच्या ड्रेसवर जर तेलाचे डाग पडले असतील तर त्यावर बेबी पावडर टाका. तासाभरानंतर ड्रेस धुवून टाका. 


हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात चादरी अथवा बेड दमट होतात. यावेळी चादरीवर अथवा बेडवर बेबी पावडर शिंपडा यामुळे दमटपणा कमी होईल.