नवी दिल्ली : स्वादिष्ट चटणी आरोग्यदायी देखील असते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. पाहुया वेगवेगळ्या चटण्यांचे फायदे.


आवळ्याची चटणी :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवळ्याची चटणी खाल्याने इम्यून सिस्टम चांगली राहते. यात असलेल्या व्हिटामिन सी आणि अन्य पोषक घटकांमुळे शरीराच्या अनेक समस्या दूर राहतात. त्याचबरोबर चटणीत आलं आणि लिंबू मिसळून खाल्याने हृद्याच्या समस्या दूर होतात.


कोथिंबीरीची चटणी :


यात  व्हिटामिन सी आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असल्याने यामुळे मधुमेहासारखे आजार दूर राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पुदीन्याच्या चटणीमध्ये अंटी-बॅक्टरीअल गुणधर्म असल्याने यामुळे बद्धकोष्ठेतेचा त्रास दूर होतो. कोथिंबीर, आलं आणि लसणाची चटणी आतड्यांचे विकार, ताप, डायरीया यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते.


कडीपत्त्याची चटणी :


या चटणीत लोह व फॉलिक अॅसिड अधिक प्रमाणात असते. त्याचबरोबर यात कॅल्शियम व इतर व्हिटॉमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस काळे, जाड व मजबूत होतात. शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यास त्याचबरोबर उच्च रक्तदाब व मधुमेहासारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते.


टोमॅटोची चटणी :


व्हिटामिन सी, लाइकोपीन, पोटॅशियम, अधिक प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म यात असतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही चटणी खाणे लाभदायी आहे.


कांदा व लसणाची :


चटणी लसणात अंटीबायोटीक, अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात. हे वयानुसार शरीरात होणारे बदल कमी करण्यास आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.