मुंबई : लोकांना भारतीय जेवणाबरोबरच आयुर्वेदीक गोष्टींमध्ये देखील खास रूची असते. याचा वापर केल्यामुळे स्वास्थ उत्तम राहण्यास मदत होते. अगदी औषधांच्या रुपातही आपण भारतीय जेवणातील पदार्थांचा वापर करू शकतो. आपल्या शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी तसेच अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी जेवणातील हे पदार्थ अधिक गुणकारी आहेत. जर तुम्ही दिवसांतून 2 लवंग रोज खाल्ले तर त्याचा होणारा फायदा हा अतिशय महत्वाचा आहे. 


काय आहे लवंगाचे फायदे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅसपासून सुटका 


एक कप पाणी उकळा आणि त्यामध्ये 2 लवंग वाटून टाका. पाणी थंड झाल्यावर प्या. 


दात दुखण होतं बंद 
2 लवंगा आणि एक चमचा लिंबूच रस एकत्र करून दातावर घासा... दुखणं लगेच थांबेल 


तोंडातून येणारी दुर्गंधी 


2 लवंग 1 छोटी वेलची एकत्र करून वाटून घ्या किंवा एकत्र चावा यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होईल. 


सर्दी आणि पडसं 


2 लवंग आणि 4 ते 5 तुळशीची पान एकत्र करून 1 कप पाण्यात उकळा. 


जंत 


2 लवंग वाटून घ्या आणि 1 चमचा मध घेऊन चाटण करा आणि त्याच सेवन करा