मुंबई :  आजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, बदलते आहार यांमुळे अनेक आजार डोकं वर काढत आहेत. एवढंच नाही तर  वाढत्या कामाच्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी नियमित पिणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. योग्य आणि नियमित प्रमाणात ग्रीन टीचे सेवन शरीरास हितकारक ठरू शकते. परंतू ग्रीन टीचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास ते आरोग्यास घातक देखील ठरू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीन टीमध्ये थेनाईन तत्व जास्त प्रमाणात असतात त्यामुळे अमिनो अॅसिड बनते. अमिनो अॅसिड शरीरात ताजेपणा कायम ठेवण्यास मदत करते. तसेच तुम्हाला थकवा जाणवत नाही. सध्या तरूणांमध्ये आणि वृद्धांमध्ये कॅव्हिटीच्या समस्या वेगाने वाढत आहेत. ग्रीन टीमध्ये कॅफीन असते जे दातांवरील किटाणू मारण्यास सक्षम असते. बॅक्टेरिया कमी झाल्याने अधिक काळापर्यंत तुमचे दात चांगले राहतात.


सतत वाढत्या कामामुळे, दरोरोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रक्त दाबाच्या समस्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रक्त दाबाचा त्रास असल्यास त्यावर ग्रीन टी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे हृदय रोग असणाऱ्यांसाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी ठरते. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म रेट वाढतो ज्यामुळे पाचनक्रिया सुरळीत होते.