मुंबई : गुलाबाच्या फुलापासून तयार केला जाणार गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात. सतत लघवीचा त्रास होत असेल तर गुलकंदाचे सेवन करावे. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो. जाणून घ्या कसा बनवतात गुलकंद


साहित्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाबच्या पाकळ्या - 200 ग्रॅम  
साखर- 100 ग्रॅम 
छोटी वेलची- 1 टीस्‍पून 
बडिशेप - १ टीस्पून


कृती 


गुलाबाच्या पाकळ्या धुवून काचेच्या भांड्यात ठेवा. 
त्यानंतर इतर सर्व साहित्या यात मिसळून झाकण लावून १० दिवस उन्हात ठेवा. 
मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहा.
जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या मऊ झाल्यात असे दिसेल तर तुमचा गुलकंद तयार आहे.


गुलकंद खाण्याचे फायदे


गुलकंदाच्या सेवनाने शरीरा ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला एनर्जी देणारे हे टॉनिक आहे. 


उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा. 


गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.


दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.


तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास यावरही गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.


ज्यांना सतत विसरण्याची सवय असते त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.