Fact Check Jaggery: गूळ खाल्यानं आपल्याला अनेक फायदे होतात असे आपल्या घरातील मोठे नेहमीच सांगताना दिसतात. इतकंच काय तर डायट करणाऱ्यासाठी किंवा ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांना साखर ऐवजी गूळ खाण्यास सांगितले जाते. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गूळ हा भारतीय जेवणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. प्राचीन काळापासून गूळाचा वापर स्वयंपाक घरात करण्यात येतो. इतकंच नाही तर गूळात अनेक औषधी गुणधर्म आहे. साखरे ऐवजी गूळ सगळ्यात चांगला आहे असे म्हटले जाते. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे सत्य... (Benefits Jaggery)
 
गुजरात येथील अहमदाबाद येथे असणाऱ्या अपोलो रुग्णालयातील डॉ. शशिकांत निगम यांनी एक रिसर्चमध्ये मदत केली आहे. यावेळी ते म्हणाले की गूळ हा ऊसापासून बनवण्यात आला आहे. गूळात जवळपास 65-70 टक्के सुक्रोज असते, तर पांढर्‍या साखरेत 99.5% सुक्रोज असते. त्यामुळे साखरेच्या जागी तुम्हाला पाहिजे असल्यास कॉफीत गूळ टाकून प्या. (Can Jaggery make Your Dish Suger Free)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते Amrapali Dubey


डॉ निगम पुढे म्हणाले की पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गूळात कमी सुक्रोज असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्यानंतर ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते. रक्तातील साखरेच्या पातळीवर गुळाचा परिणाम रिफाइंड साखरेसारखा असू शकत नाही, परंतु ग्लायसेमिक इंडेक्स नावाच्या महत्त्वाच्या घटकामुळे गूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदे कारण असल्याचे म्हटले जाते. (Sugar Vs Jaggery)


गूळ खाण्यास का देतात लोक पसंती आणि घरातील मोठे का सांगतात रोजच्या जीवनात गूळाचा समावेश करण्याचा सल्ला? 


गूळचा वापर करत अनेक पदार्थ बनवण्यात येतात. ऊसात नैसर्गिक गोडवा असतो आणि ऊसापासून साखर बनवली जाते, इतकंच काय तर त्यात अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे लोक गूळ खाण्यास पसंती देतात. गूळात अनेक जीवनसत्व असतात. त्यासोबत आयरन आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमी आहे त्यांनी गूळाचे सेवण केले पाहिजे असे डॉ. निगम यांनी म्हटले आहे. (Why Should add Jaggery In Your Food)


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)