मुंबई : जवसचा वापर रोजच्या आहारात करणे फाय महत्त्वाचे आहे. जवसचे तेल स्वयंपाकघरात अवश्‍य केला पाहिजे. जवसचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. दाह कमी करते - लघवी करतांना होणारी दाह कमी करण्यासाठी जवस फायद्याची ठरते. यासाठी जवसचा काढा बनवावा. 12 ग्रॅम जवस आणि 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन त्याची पूड करुन घ्यावी. त्यानंतर 1 लीटर पाण्यात ते उकळून घ्यावे. हा काढा तयार झाल्यानंतर त्यात 12 ग्रॅम खडीसाखर टाकावी आणि रोज 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळ घ्यावे. लघवीच्या जागी होणारी जळजळ कमी होते.


2. हिरड्या आणि दात मजबूत करते - हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. जवसच्या तेलाने मसाज करावा.


3. कफ बाहेर काढणे -  जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.
 
4. पाठदुखी - पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.


5. भाजलेल्या जागी बांधावे - एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.


6. पचन क्रिया सुधरते - आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.


7. इतर फायदे - रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.