Papaya Benefits : पपई उष्ण असते, मग ती उन्हाळ्यात खावी का? याबद्दल काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
खरं तर पपईला पोषक तत्वांचे भांडार म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.
मुंबई : उन्हाळ्यात थंड फळे किंवा थंड पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. जे खाल्याने आपल्याला बरं वाटतं, एवढंच काय तर शरीर आतुन थंड ठेवण्यात देखील मदत मिळेल. तसेच अनेक तज्ज्ञ देखील आपल्या थंड फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु पपईहे उष्ण प्रभाव असलेले फळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पपईचे सेवन करावे की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, उन्हाळ्याच्या दिवसात पपईचे सेवन मर्यादित प्रमाणात करता येते, असे अनेक आरोग्यतज्ज्ञ सांगतात. चला तर मग जाणून घेऊया ते खाण्याची योग्य वेळ आणि फायदे.
खरं तर पपईला पोषक तत्वांचे भांडार म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पपई ही फायदेशीर मानली जाते. पपईबाबत आणखी माहिती जाणून घेऊ या.
1. वजन कमी करणे
जर तुम्ही दिवसा पपईचे सेवन केले, तर ते तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. पपईमध्ये आढळणारे गुणधर्म दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास आणि संध्याकाळी नको असलेली भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2. पचन
नाश्त्यात आणि रात्री पपईचे सेवन कधीही करू नये. कारण यामध्ये आढळणारे घटक पचनाची समस्या वाढवू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही दिवसा पपईचे सेवन केले तर ते पचनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकते.
3. त्वचा
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून कधीही पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचेला अनेक समस्यांपासून लांब ठेवता येते.
4. हायड्रेशन
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही दिवसा पपईचे सेवन करू शकता. कारण पपईमध्ये पोषक तत्वांसह पाणी देखील चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवता येते.