मुंबई : उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैरीमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्ताचे विकार अथवा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात. याशिवाय उन्हाळ्यात अॅसिडिटीचा त्रासही अधिक होतो. कैरी मिठासोबत खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. 


शुगर लेव्हल कमी करण्यासाठी कैरी दही आणि भातासोबत खावे. आंब्याचा रस सेवन केल्याने घामाद्वारे सोडियम क्लोराईड आणि आर्यनसारखी तत्वे शरीराबाहेर पडत नाहीत. कैरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढत नाही.


आंब्याच्या कोयीचेही अनेक फायदे


आंब्याचे जसे फायदे आहेत तसेच आंब्याच्या कोयीचेही फायदे आहेत. कोयीमुळे पोटासंबंधित आजार दूर होतात. मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव होत असेल तर याच्या कोय सुकवून त्याची पावडर बनवा. ही पावडर एक चमचा सकाळ-संध्याकाळ पाण्यासोबत घ्या.