Benefits of Yoga: वाढते प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला आरोग्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीच्या उपचारपद्धतीकडे लोकांचा कल वाढला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योगासनांना सर्वोत्कृष्ट मानले जाते. यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सध्या अनेकजण योगासनांकडे वळताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य निरोगी ठेवण्यासोबत मनावर ताबा ठेवण्यासाठीही योगासन हा उपयोगी आहेत. योगासन करताना श्वसनक्रिया व आसन करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. यांमुळे अनेक फायदे होत असून मानसिक ताणहीकमी होण्यास मदत होते. योगासनांमुळे रागावर नियंत्रण ठेवता येते तसेच रोगांपासूनही मुक्ती मिळते. दररोज किमान अर्धा तास योगासनासाठी राखून ठेवल्यास संपूर्ण आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.


जाणून घेऊयात नियमित योगा करण्यानं काय फायदे होतात.


  • योगासने, प्राणायम तसेच ध्यान-धारणा या गोष्टींमुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

  • सूर्य नमस्कार, कपालभाती या क्रियांनी शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नियमित योगा केल्याने शरीराला अन्नाची केव्हा गरज आहे हे जाणवते. योग्य आहार घेतल्याने वजन नियंत्रणात राहते.

  • योगासनांमध्ये ताण तणाव नष्ट कऱण्याची प्रभावी तंत्रे आहेत. त्यामुळे दररोज पुरेसा योगा केल्याने शरीरातील ताणतणावांचा निचरा होण्यास मदत होईल.

  • योगामुळे निरनिराळे अवयव आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • आजकाल दिवसभराच्या सतत कामाने थकवा जाणवतो. परंतु दररोज काही मिनिटे व्यायाम केल्याने तुम्ही दिवसभर उत्साही आणि ताजतवाने राहता.

  • दैनंदिन कार्यक्रमात योगाचा समावेश केल्याने शरीर सशक्त, चपळ तसेच लवचिक बनते. रोज न चुकता योगा केल्यास शरीराच्या स्नायूंना बळकटी येते आणि शरीराची ठेवण सुधारते.

  • योग करणार्‍या लोकांना झोपेचा त्रास होत नाही. अशा लोकांना शांत झोप लागते.

  • योगामुळे कार्टिसोल नावाच्या हार्मोन्सची पातळी कमी होते. हे हार्मोन्स पोटात चरबी जमा करण्यासाठी मदत करतात.


योगाचे अनेक फायदे आहेत. पण ते अनुभवण्यासाठी योगा योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. योगाभ्यास करताना आपले पुर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करावे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पध्दत अवलंबण खुप आवश्यक असते. योगा आपण कोणत्याही ठिकाणी करु शकतो, परंतु बाहेर योग केला तर ताजी हवा आणि उन्हाचा आनंद घेता येतो. यामुळे मेंदूला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे शक्य झाले तर निसर्गाच्या सहवासात योगा करावा.