मुंबई: चिकूचा गुणधर्म थंड आहे. रोज चीकू खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला निरोगी राहण्यासाठी ऋतूनुसार फळ खाण्याचा सल्ला देतात. चिकू हे फळ अगदी आपल्याला सहज उपलब्ध होणारं आहे. एक छोटा चिकू खाण्याचे फायदे अनेक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिकू खाल्ल्यानं पित्ताशय चांगलं राहातं इतकच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नियमितपणे चिकू सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात आणि कर्करोग सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. आज आम्ही आपल्याला चिकूच्या फायद्यांविषयी माहिती देत ​​आहोत.


1. कॅन्सरचा धोका कमी करतो?
चिकूमध्ये व्हिटामिन अ आणि ब जीवनसत्व असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, अॅन्टी ऑक्सिडाइज सारखे घटक असतात. या फळाचं नियमित सेवन केल्यानं कर्करोगाच्या आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
2. डोळ्यांसाठी गुणकारी
चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या फऴामध्ये अ जीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ गुणकारी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात. 
3. चिकूमध्ये तुमचं सौंदर्य जपण्याचा गुण
चिकू खायलाही चांगला आणि शरीरासाठी गुणकारी आहे. रोज एक चिकू खाल्ल्यानं आपलं सौंदर्य आणि त्वचा अधिक चांगली राहू शकते. अॅन्टी ऑक्सीडेंट, अॅन्टी व्हायरल असे या फळात गुण असतात. 
4. ताण दूर करण्यासाठी मदत
सध्या काम आणि इतर टेन्शनमुळे आपण रोज थकत असतो. आपला थकवा दूर करण्यासाठी डॉक्टर भरपूर फळांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. या फळांमध्ये रोज चिकूचाही समावेश केला तर तणावापासून आपण दूर राहू शकतो. चिकूमधून आपल्याला ऊर्जा मिळते. 
5. पळवून लावेल ताप
तापाची समस्या असेल तर चिकूचं सेवन करावं. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 


सूचना-हा लेख सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुम्ही कोणत्याही आजाराचा सामना करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.