उन्हाळ्यात हवीय नितळ त्वचा, डर्मेटोलॉजिस्टने सांगितल्या खास टिप्स
Summer Skin Care Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे या सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी बरेचजण ठिकठिकाणी प्रवास करतात, नवीन जागांना भेट देतात. पण, तुम्ही निवडलेल्या ठिकाणी भेट देण्यापुर्वी तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेणे ही गरजेचे आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्याल आणि उपचार कसे कराल याविषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
प्रवासापूर्वी आपल्या त्वचेची काळजी घेतल्यास आपली त्वचा निरोगी आणि नितळ राहते. प्रवासामुळे तुमची त्वचा वेगवेगळ्या हवामान, वातावरण आणि प्रदूषकांच्या संपर्कात येते ज्यामुळे कोरडेपणा, त्वचा कोरडी पडणे, मुरुम, फोड आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी एक चांगले स्किनकेअर रुटीन फॉलो करायला विसरु नका, तुम्ही तुमच्या त्वचेला या आव्हानांसाठी तयार करण्यात आणि तिचे नैसर्गिक संतुलन राखण्यात मदत करू शकता.
प्रवासापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा चांगली राखण्यास मदत होते. तणावामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे त्वचेचा लालसरपणा, खाज आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो. प्रवासापूर्वी स्किनकेअरमध्ये रुटीन फॅालो केल्याने तसेच चांगल्या दर्जाच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्यास त्वचा निरोगी आणि तजेलदार राखण्यास मदत होते. अशावेळी डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करा.
उन्हाळ्यात नितळ त्वचेची कशी काळजी घ्याल?
· उत्तम स्कीन केअर रुटीने हे तुमच्या त्वचेसाठी योग्य ठरते तसेच योग्य पध्दतीने सीरम, मॉइश्चरायझर्स किंवा सनस्क्रीनचा वापर केल्यास ते अधिक प्रभावीपणे त्वचेमध्ये खोलवर जाऊन संरक्षण करते.
· प्रवासाला जाण्यापुर्वी तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहिल याची खात्री करा आणि योग्य ती काळजी घ्या.
· तुमची त्वचा हायड्रेट राखण्यासाठी आणि कोरड्या हवेपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या स्किनकेअरमध्ये हायड्रेटिंग सीरम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
· सनस्क्रीन वापरायला विसरू नका कारण अतिनील किरण त्वचेस हानीकारक ठरु शकतात. केवळ डॉक्टरांनी शिफारस केलेले सनस्क्रीन वापरा आणि त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवा.
· एक्सफोलिएशन ही प्री-ट्रॅव्हल स्किनकेअरमधील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे कारण ती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि तुमची उत्पादने त्वचेत खोलवर जाण्यास मदत करते.नितळ, तेजस्वी त्वचेसाठीसौम्य एक्सफोलिएटिंग स्क्रब आणि उत्पादनांची निवड करा.
· भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा आणि बाहेरून हायड्रेटिंग फेस मास्क किंवा मिस्ट्स वापरून लांबचा विमान प्रवास किंवा कार राईड करा. यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचाल तेव्हा तुमची त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.
या स्किनकेअर उपचारांची निवड करा
· तुमच्या सुट्टीपूर्वी स्किनकेअर उपचारांपैकी करु शकणारे उपचारांमध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे हायड्रेटिंग फेशियल. हे तुमच्या त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन राखण्यास मदत करते ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि टवटवीत वाटेल.
· दुसरा पर्याय म्हणजे अनेकांनी निवडलेली केमीकल पील्स जी त्वचेच्या बाहेरील थराला एक्सफोलिएट करून त्वचा नितळ व त्वचेचा रंग उजळविण्यास मदत करते.
· मायक्रोडर्माब्रेशन हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेवरील छिद्रे बंद करण्यात मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहलीसाठी अधिक तेजस्वी त्वचा अनुभवायला मिळेल. या प्रक्रियेसाठी प्रशिक्षित तज्ञाची निवड करायला विसरु नका.