मुंबई : सध्या असे अनेक आजार आहेत, ज्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य राहण्यास बाधा येते. डेंग्यू, कोविड, फ्लू आणि इतर अनेक गंभीर आजार आहेत, ज्यांचा तुमच्या खिशाला खूप मोठा फटका बसतो. तुमच्या खिशावर अचानक होणाऱ्या खर्चाचा ताण पडू नये म्हणून तुम्ही आरोग्य विमा घ्यावा अशी अनेकदा डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांकडून शिफारस केली जाते, पण मेडिकल इंश्‍योरेन्‍स काढताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, याची अनेकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया...


तुमची कंपनी आधीच मेडिकल इंश्‍योरेन्‍स देत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे असल्यास, तुम्ही ग्रुप हेल्थ इंश्‍योरेन्‍स योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्यामध्ये कमी खर्चात अधिक फायदे आहेत. ग्रुप प्लान हे कव्हरेजच्या बाबतीत रिटेल प्लानपेक्षा चांगल्या आहेत, जसं की मोठे कॅशलेस नेटवर्क किंवा पहिल्या दिवसापासून रोग कव्हर. कंपन्या बर्‍याचदा काही भाग किंवा संपूर्ण प्रीमियम भरतात.


कुटुंबीयांचा मेडिकल इंश्‍योरेन्‍स काढला?


तुम्ही कव्हर करण्यासाठी जे काही निवडता, ते थेट पॉलिसीचं मूल्य वाढेल. फॅमिली फ्लोटर घेतल्याचा अर्थ असा आहे की, तुमची इंश्‍योरेन्‍स रक्कम तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सामान्य कव्हरेज होईल. 4 लोकांच्या कुटुंबासाठी 2-3 लाख रुपयांचे मानक कव्हर पुरेसं असू शकत नाही. तसेच, ज्येष्ठ नागरिक कव्हरेज महाग असू शकतं, बहुतेक  बेसीक प्लानमध्ये  20 हजार रुपयांपेक्षा जास्त सुरू होते.


तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारखे जुनाट आजार आहेत का?


अनेक किरकोळ प्लान पहिल्या दिवसापासून PED (पूर्वीपासून अस्तित्वात असलेला आजार) कव्हर करत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये, PED साठी कव्हरेज तिसऱ्या वर्षापासून सुरू होते. तुम्हाला एखाद्या दीर्घकालीन समस्येसाठी दावा करायचा असल्यास, तुमचा इंश्‍योरेन्‍स कदाचित काम करणार नाही!


तुम्ही लवकरच पालक होणार आहात का?


असं असल्यास, तुमच्या इंश्‍योरेन्‍स प्लानमध्ये मॅटरनिटी कव्हरेज असल्याची खात्री करा. तुमचं घर आणि रुग्णालय यावर आधारित, मुलाच्या जन्मासाठी 50,000 ते 2 लाख रुपये खर्च होऊ शकतो. आगाऊ इंश्‍योरेन्‍स काढणं ही उत्तम कल्पना आहे, जेणेकरून जेव्हा डिलीव्हरीची वेळ येईल तेव्हा तुम्ही हा खर्च भरून काढू शकाल.


मेडिकल कव्हरपेक्षा जास्त गरज आहे का?


अपघाती गंभीर आजाराच्या बाबतीत इंश्‍योरेन्‍स हे एक महत्वाचं आणि उपयोगी असं आर्थिक साधन आहे. पण इतर मेडिकलच्या खर्चाचं काय जो जास्त आहे? जसं की, डॉक्टरांना भेटणं, लॅब चाचण्या आणि बेसिक कंसल्‍टेशंस ? तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी अस्सल आणि सर्वसमावेशक कव्हरेज हवं असल्यास, अतिरिक्त OPD लाभांसह मेडिकल इंश्‍योरेन्‍स घ्या.


( सैजन्य : द हेल्थ साइट डॉट कॉम)