How To Buy Sweet Melon: उन्हाळ्याच्या दिवसांत समर फुड आवर्जुन खाल्ले जातात. ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशी फळे खाल्ली जातात. कलिंगड, टरबूज, खरबुज ही फळ खाल्ली जातात. त्यामुळं शरीरातील डिहायड्रेशन भरुन निघते. पण हल्ली अनेक फळ नैसर्गिकरित्या पिकवलेली नसतात. त्यामुळं ही फळी शरीरासाठी अपायकारक असतात. कारण या फळांमध्ये केमिकल असते. रासायनिक पद्धतीने  पिकवलेली फळं दिसायला खूप फ्रेश असतात. मात्र ही फळे खाल्ल्याने कँन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडे खरबुजदेखील केमिकलचे इंजेक्शन देऊन पिकवले जाते. रासायनिक प्रक्रिया करुन पिकवलेले खरबूज खाल्ल्याने अनेर आजार ग्रासू शकतात. त्यामुळं तुम्ही देखील बाजारात खरबूज खरेदी करण्यासाठी जात असाल तर या टिप्स लक्षात ठेवा. केमिकलने पिकवलेले व नैसर्गिकरित्या पिकवलेले खरबुज कसे ओळखायचे हे लक्षात घेऊया. 


बनावट खरबुज खाल्ल्याने काय होते?


अनेक अहवालानुसार, केमिकल प्रक्रिया देऊन पिकवलेल खरबूज आरोग्यासाठी हानिकारक असते. हे खरबूज पिकवण्यासाठी  Erythrosine B केमिकलचा वापर केला जातो. हे एक प्रकारचे चेरी किंवा मेलन-पिंक सिंथेटिक असते. जे फळांना रंग देण्यासाठी वापरण्यात येते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे केमिकल डीएनए डॅमेज करु शकते. यामुळं थायरॉइड, डोकेदुखी, उलटी, बद्धकोष्ठ, पोटदुखी याबरोबर कँन्सरसारखी गंभीर परिणाम करणाऱ्या आजारांचा धोका निर्माण करते. 


नैसर्गिक रित्या पिकवलेले खरबूज कसे ओळखाल?


नैसर्गिक रित्या पिकवलेल्या खरबूजमध्ये काही निशाणी असते ती ओळखल्यास तुम्हाला कळेल की खरबुज नैसर्गिक आहे की बनावट. 


1 सफेद निशाण
2 डाग
3 धारदार रेषा
4 आतून भरलेले फळ
5 फळाला खालून डार्क रंग
6 कमी बिया आणि वजनाला हलके


ही लक्षणे ओळखून तुम्ही अंदाज लावू शकता की खरबूज खरे आहे की बनावट. 


उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात खूप उष्णता निर्माण होते. त्यामुळं अॅसिटीडी, पोटदुखी, डोकेदुखी, गॅस, थकवा  यासारखी परिस्थिती निर्माण होते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व डिहायड्रेशन कमी करण्यासाठी खरबुजा एक उत्तम पर्याय आहे. 


ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिल


या दिवसांत नेहमीच हाय ब्लड प्रेशरचा सामना करावा लागतो. ज्यांचा बीपी लवकर वाढतो त्यांच्यासाठी खरबुज उत्तम पर्याय आहे. खरबुजमध्ये पोटॅशियम जास्त असते आणि सोडियमची मात्रा कमी असते. त्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 


मधुमेह नियंत्रणात


मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवी होते. उन्हाळ्यात ही समस्या अधीक तीव्र होऊ शकते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांना खरबुज खाल्लं पाहिजे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)