चांगल्या बॉडीसोबत नसंही दाखवायच्या आहेत ? करा फक्त एवढंच
आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.
मुंबई : आपली शरीरयष्टी चांगली दिसावी यासाठी अनेक तरुण व्यायामशाळेत घाम गाळत असतात. नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप, योग्य आहार यामुळे ते काही महिन्यात चांगली शरीरयष्टी कमावतात पण यावरच त्यांचं समाधान होत नाही. आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.
आहाराकडे लक्ष
बॉडीतील नसं दिसतायत का ? यावरूनही चर्चा करणारे अनेकजण असतात. सिनेमांमध्येही हिरोने टी शर्ट काढल्यावर त्याच्या शरीरावरील नसं दिसतात. त्यामुळे या तरुणांची इच्छाशक्ती अधिक दृढ होते. अस शरीर कमावण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेच आहे. याबद्दल आपण जाणून घेवूया...
सोडियम सेवन वर्ज्य
सोडियमचे सेवन शरीरात वॉटर रिटेंशनच कारण बनतं. वॉटर रिटेशनमुळे आपल्या नसं अस्पष्ट दिसतात. त्यामुळे जेवणातही कमी मीठाचा उपयोग करणं गरजेच आहे.
स्नायू बनवा
शरीरयष्टी कमावताना तुमच्या आहारासोबतच तुम्हाला स्नायूंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्नायू हे प्रोट्युडिंग वेन्स तयार करतात.
खूप पाणी प्या
शरीरात मुबलक पाणी गेल्यास स्नायू हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्याचा खूप फायदा होतो. शरीरातील पाणी टॉक्सिंसला फ्लश करते यामुळे बाइसेप्सच्या नस स्पष्टपणे दिसतात.