ओमिक्रॉनला कमी लेखणं सर्वात मोठी चूक ठरेल
बूस्टर डोसचा नवीन व्हेरिएंटवर परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
मुंबई : कोरोना संकटावर चिंता व्यक्त करताना, जागतिक आरोग्य संघटनेचे डीजी टेड्रोस अधानोम म्हणाले की, ते बूस्टर डोसच्या विरोधात नाहीत. उलट ते विषमतेच्या विरोधात आहेत. ते म्हणाले की, आमची मुख्य चिंता सर्वत्र लोकांचे प्राण वाचवणं आहे.
ते म्हणाले की, ओमायक्रॉन नंतर, अनेक देशांनी कोविड 19 बूस्टर प्रोग्राम सुरू केला आहे, तर बूस्टर डोसचा नवीन व्हेरिएंटवर परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही.
Omicron ला थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक
WHO ने सांगितलं की, Omicron चा प्रसार सुरुवातीपासून अवलंबलेल्या सर्व उपायांनीच थांबवला जाऊ शकतो. त्याची लवकरच गांभीर्याने अंमलबजावणी व्हायला हवी. एकट्या लसीने कोणताही देश या संकटातून बाहेर पडू शकणार नाही.
आतापर्यंत 77 देशांनी Omicron प्रकरणांची पुष्टी केली आहे. मात्र सत्यता पाहिली तर ओमायक्रॉन यापेक्षा अधिक देशांमध्ये आहे. जरी ते अद्याप त्याची अधिकृत माहिती नसलं तरीही.
डब्ल्यूएचओ म्हणतं की, 41 देश अजूनही त्यांच्या लोकसंख्येच्या 10% लोकांवर लसीकरण करू शकलं नाही. त्याच वेळी, 98 देश 40% पर्यंतही पोहोचलेले नाहीत. गंभीर आजार किंवा मृत्यूचा कमी धोका असलेल्यांना बूस्टर डोस दिल्याने उच्च-जोखीम असलेल्या लोकांचं जीवन धोक्यात येतं. जे अद्याप पुरवठ्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या पहिल्या डोसची प्रतीक्षा करत आहेत.
ओमिक्रॉनला कमी लेखणं ही सर्वात मोठी चूक
डब्ल्यूएचओ डीजी म्हणाले की, लोक ओमायक्रॉनला सौम्य विषाणू म्हणून कमी समजतायत याबद्दल आम्हाला चिंता आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर परिणाम करू शकते.