मुंबई : वजन कमी करणं हे काही सोप्प काम नाही. अशातच 6-7 महिन्यात 35 किलो वजन कमी करणं म्हणजे नवलंच. पण ही कामगिरी करून दाखवलीये बिहारच्या एका 12 वीत शिकणाऱ्या मुलाने. बिहारचा असणारा शुभम श्रीवास्तवचं 17 व्या वर्षीच 122 किलो वजन होतं. त्याच्या वजनात होणारी वाढ त्याला सातत्याने जाणवत होती. अशा परिस्थितीत त्याला पॅनिक अटॅकचाही त्रास समोर आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जेव्हा शुभमच्या लक्षात की, लठ्ठपणा त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो तेव्हा त्याने डाएटकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. असं करताना त्याने अवघ्या 6-7 महिन्यांत 35 किलो वजन कमी केलंय.


कधी आला टर्निंग पॉईंट


शुभमच्या सांगण्यानुसार, मला माझ्या वजन वाढीची काळजी वाटत होती. मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असं मनात असल्याने मी मध्यरात्री दचकून उठायचो. मी माझ्या सर्व आशा गमावल्या होत्या. मी शारीरिक आणि मानसिक रूपाने कमकुवत होत होतो.


तेव्हा माझ्या वडिलांनी मला वजन कमी करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. एवढेच नाही तर माझ्यासोबत त्यांनी त्यांचंही वजन 26 किलोने कमी केलं. मी आणि माझ्या वडिलांनी मिळून हा प्रवास सुरू केला आणि 6-7 महिन्यांत हा टप्पा गाठला, असंही शुभमने सांगितलं.


शुभमचं डाएट कसं होतं?


नाश्ता


इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये 15-16 तास उपवास झाल्यानंतर सकाळचा नाश्ता स्किप करावा लागला. मात्र सकाळी 11 वाजता बदाम, खजूर आणि अक्रोडचं सेवन शुभम करत होता.


दुपारचं जेवण


घरी बनवलेला डाळ आणि  हिरव्या भाज्या तो खायता. दुपारी 1.45 पर्यंत जेवण करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा.


रात्रीचं जेवण


दोन-तीन अंडी आणि डाळ. शिवाय रात्रीचं जेवणं शुभम संध्याकाळी 7च्या अगोदर करायचा.


वर्कआउट आणि फिटनेस सीक्रेट


शुभम म्हणतो, सुरुवातीला माझ्यासाठी गोष्टी सोप्या नव्हत्या. मी रोज स्वतःला पुश करत होतो. मी शक्य तितकं चांगलं खाण्याचा प्रयत्न करायचो. 


स्वतःला कसं मोटीव्हेट केलं?


माझ्या वेटलॉसच्या प्रवासात मी स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी मी स्वतःला बारीक असण्याची कल्पना करत होतो. माझे वडील मला नेहमी सांगतात की, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यांचे शब्द मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतात.


​लाइफस्टाइलमध्ये काय बदल केले?


फीट राहण्यासाठी शुभमने आपल्या जीवनशैलीत एक छोटासा बदल केला. शुभम नेहमी निरोगी आणि चांगलं खाण्यावर भर द्यायचा.