मुंबई : सध्या ब्लॅक कॉफीकडे लोकांचा कल वाढताना दिसतोय. दररोज ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक फायदे लोकांना माहिती झाले आहे. हे फायदे वाचून तुम्हीही ब्लॅक कॉफी पित असाल. पण तुम्हाला माहितीये का, या कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलची लेवल वाढू शकते, असं नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉर्वेमधील संशोधकांनी, कॉफी पिण्याची पद्धत आणि त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी तपासली. या संशोधनासाठी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 21 हजारांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये कॉफी पिण्याचा महिलांवर वेगळा आणि पुरुषांवर वेगळा परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.


कॉफीने वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका


ज्या व्यक्ती दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पितात त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कॉफी न पिणाऱ्यांपेक्षा जास्त असते. जे पुरुष तीन ते पाच वेळा कॉफी पितात त्यांच्यात कोलेस्ट्रॉल स्त्रियांपेक्षा जास्त असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.


सहा कपपेक्षा जास्त कॉफी महिलांसाठी धोकादायक


अधिक प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. पण महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. दरम्यान संशोधनातून असंही समोर आलं आहे की, जर महिलांनी सहा वेळा ब्लॅक कॉफीचं सेवन केलं तर त्यांनाही कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असू शकतो.