मुंबई : भात (white rice) नाही खाल्ला तर पुर्ण जेवल्यासारख वाटतंच नाही. कारण भात भात आहे, त्याची सर कुणालाच नाही. मात्र मधूमेहाच्या रूग्णांना (Diabetic Patients) भात खाण्यावर कंट्रोल ठेवावा लागतो. कारण भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे अशावेळी मधूमेहाच्या रूग्णांची फार पंचाईत होते. त्यामुळे या मधूमेहाच्या रूग्णांनी पांढर्‍या तांदळापेक्षा काळा तांदूळ खाल्ला पाहिजे. मधुमेहाचे रुग्ण काळा भात खाऊ शकतात.त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. 


काळा भात खाण्याचे फायदे


ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या तांदळात व (Black rice) जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. एवढेच नाही तर तांदळाचे इतरही फायदे आहेत. काळ्या तांदळात अँटी-ऑक्सिडंट प्रोटीन्स आणि आयन असतात, त्याशिवाय काळ्या तांदळात अँटी-इंफ्लेमेटरी आणि ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.


वजन कमी करते


मधुमेहाच्या रुग्णांसाठी वजन वाढणे ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना पांढरा भात खाण्याचा सल्ला दिला जातो, अशावेळी काळा भात  (Black rice) खाल्ल्याने चव टिकून राहते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.


ग्लूटेन मुक्त


मधुमेहाच्या रुग्णांना ग्लूटेन टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी काळा भात (Black rice) खाणे फायदेशीर ठरते कारण ते ग्लूटेन फ्री असते.


हृदयविकारात फायदेशीर  


काळा तांदूळ  (Black rice) हृदयरोग आणि त्याचा धोका कमी करण्यास मदत करतो. हे डोळ्यांसाठीही चांगले असते. यामध्ये भरपूर फायबर असते, म्हणूनच ते शरीरात चरबी वाढू देत नाही आणि लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)