जगातील सर्वात महागडा कलिंगड, ज्याच्या एका तुकड्याची किंमत लाखोंमध्ये...
तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे.
मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली की, आपलं मन दोन रसाळ फळांकडे वळतं, एक म्हणजे आंबा आणि दुसरं म्हणजे कलिंगड. हे दोन्ही फळं उन्हाळ्यात येतात आणि त्यांना खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकत नाही. या दोन्ही फळांमध्ये आंबा हे कलिंगडच्या मानाने जास्त महाग आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, जगात असं देखील कलिंगड आहे. ज्याचा फक्त एक तुकडा लाखोंमध्ये विकला जातो? हो तुम्ही बरोबर एकलंत.
तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे. या कलिंगडला ब्लॅक कलिंगड किंवा डेन्सुक कलिंगड म्हणतात.
जगातील हा सर्वात महाग कलिंगड जपानमध्ये आढळतो.
आपल्याकडे 50 ते 100 रुपयांपर्यंत मिळणारा कलिंगड हा जपानमध्ये इतका का महाग विकला जातो? चला तर याबद्दल जाणून घेऊ या.
हा कलिंगड बाहेरील बाजूने काळ्या रंगाचे असते, म्हणून त्याला ब्लॅक कलिंगड हे नाव पडले. इतर किलिंगडांपेक्षा ते किती वेगळे आहे, हे अशा प्रकारे स्पष्ट केले जाऊ शकते की, ते सामान्य किलिंगडसारखे बाजारात विकले जात नाही. तर या खास किलिंगडांची बोली लागते. म्हणूनच जगातील सर्वात महागड्या किलिंगडांमध्ये त्याची गणना होते.
2019 मध्ये एक काळा किलिंगड 4.5 लाख रुपयांना विकला गेला. हे जपानच्या होक्काइडो बेटाच्या उत्तरेकडील भागात आढळते. त्याचे उत्पादन खूपच कमी आहे. म्हणूनच याला दुर्मिळ किलिंगड असेही म्हणतात.
येथे एका वर्षात सुमारे 100 काळे किलिंगड तयार होतात. ते चव, बाह्य आणि बियांच्या बाबतीत भिन्न आहे.
हे काळे किलिंगड इतर किलिंगडांपेक्षा गोड असते. म्हणूनच ते सर्वात गोड किलिंगड मानले जाते. त्यात फार कमी बिया असतात. बियांची संख्या कमी असल्याने ते खाणे सोपे जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांमुळे ते जपानमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
सामान्यतः इतर किलिंगडांच्या बाहेरील भागावर पट्टे असतात, परंतु काळ्या किलिंगडांमध्ये असे होत नाही.
ते पॉलीबॅगमध्ये न ठेवता प्रीमियम बॉक्समध्ये ठेवून वितरित केले जाते. जपानमध्ये ते फक्त खाण्यासाठीच नाही, तर भेटवस्तू म्हणूनही विकत घेतले जाते. महागडे असल्याने हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वांमध्येही हा कलिंगड गिफ्ट करण्याचा ट्रेंड आहे.