Blood Sugar Control: डायबेटीजच्या रूग्णांना डायबेटीज (Diabetes) कंट्रोलमध्ये आणणं हे सोप्पं काम नाही. मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये स्वादुपिंड कमी इन्सुलिन तयार करतो किंवा काही प्रकरणांमध्ये इन्सुलिन (Insulin) तयार करणं थांबवतो. जर शरीरात इन्सुलिनचं कमी उत्पादन झालं तर रक्तातील साखरेची (Blood sugar) पातळी वाढते. शुगर नियंत्रणात येण्यासाठी डायबेटीजच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणं, ताणासून दूर राहणं गरजेचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे काही पदार्थ आहेत जे ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर काही पदार्थ याउलट असून रक्तातील शुगर वाढवतात. त्यामुळे या रूग्णांनी आहाराची काळजी घेतली नाही तर अशक्तपणा वाढण्याची समस्या असते. अशा परिस्थितीत ऊर्जा मिळण्यासाठी काही सकस आहार आवश्यक असतो.


त्यामुळे मधुमेही रूग्णांच्या मनात एक प्रश्न कायम असतो तो म्हणजे पनीर खावं की नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मधुमेही रुग्ण पनीर खाऊ शकतात. जाणून घेऊया हे पनीर आरोग्यासाठी किती आवश्यक ठरू शकतं.


शुगर असलेल्या रूग्णांनी पनीर खावं का?


मधुमेही रूग्णांना जर पनीर खायला आवडत असेल आणि तुम्ही ते खाणं टाळत असाल तर खाण्याची इच्छा कंट्रोल करणं थांबवा. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, मधुमेहाचे रुग्ण देखील पनीरचे सेवन करू शकतात. मुख्य म्हणजे पनीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतं ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात शुगरच्या लेवलमध्ये वाढ होत नाही.


पनीरमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे डायबेटीजच्या रूग्णांसाठी हे एक उत्तम अन्न मानलं जातं. त्याचप्रमाणे पनीरमध्ये असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जा देतात. शिवाय यामध्ये चरबीचं प्रमाण कमी आणि प्रोटीन्स जास्त असतात. हे सर्व फायदे असल्यामुळे मधुमेही रुग्ण पनीरचं सेवन करू शकत नाहीत.


पनीरचं सेवन किती आणि केव्हा करावं?


डायबेटीजच्या रूग्णांनी दिवसा किंवा रात्रीच्या जेवणात पनीर सेवन करणं फायदेशीर ठरेल. टोनच्या दुधापासून तयार केलेलं पनीर ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठेरल. या रुग्णांसाठी एका दिवसात 80 ते 100 ग्रॅम पनीर पुरेसं आहे.