तुमची त्वचा झाली ड्राय? तर वापरा हे Body Butter त्वचा होईल कोमल
Body Butter for smooth soft and nourished skin: बॉडी बटर म्हणजे नक्की काय? आणि ते कशा प्रकारे तुमची त्वचा कोमल बनतं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल... तर लगेच वाचा ही बातमी. यावेळी आम्ही तुम्हाला कोणतं बॉडी बटर वापरायला हवं आणि त्याचा काय काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
Body Butter : आपण अंघोळ करून बाहेर आलो की आपल्याला आपली त्वचा ही खूप ड्राय असल्याचं जाणवतं. अशात अनेकांना इर्रिटेशन किंवा इचिंग सुद्धा होते. त्यावेळी काय करावं हे अनेकांना कळत नाही. काही लोक असं काही आपल्या शरीराला लावतात की त्यानं हा त्रास आणखी वाढतो. तर काही लोक मॉइश्चराईजर लावतात. पण त्यानं आपली त्वचा ही खूप वेळ मॉइश्चराईज राहिल याची काही शक्यता नाही. पण त्याच जागी जर तुम्ही बॉडी बटरचा वापर केला तर त्यानं तुमची त्वचा ही खूप वेळ मॉइश्चराईज राहण्याची शक्यता जास्त आहे. कारण बॉडी बटर हे त्वचेसाठी खूप सॉफ्ट आणि स्मूद असतात. कारण बॉडी बटर हे ड्राय स्किनला मॉइश्चराईज ठेवण्यास मदत होते. आज आपण अशाच काही बॉडी बटर विषयी जाणून घेणार आहोत, जे आपल्याला त्वचा मॉइश्चराईज ठेवण्यासाठी फक्त मदत करणार नाही तर त्यात हानिकारक केमिकल सुद्धा नाहीत.
आज आपण आयुर्वेदिक आणि नॅच्युरल बॉडी बटर विषयी जाणून घेणार आहोत. तुम्ही जर हे बॉडी बटर वापरले तर तुमची त्वचा ही 24 तास मॉइश्चराईज राहण्यासाठी खूप मदत होते. हे बॉडी बटर आयुर्वेदिक असून महिला आणि पुरुष कोणीही वापरु शकतं. सगळ्यात आधी बॉडी बटर नक्की काय असतं आणि ते काम कसं करतं ते जाणून घेऊया... बॉडी बटर हे आपल्या त्वचेला मॉइश्चराईज आणि स्मूद ठेवण्यास मदत होते. त्यांनी तुम्ही ओठ, हाथ, कोपर आणि पायाला लावू शकतात. बॉडी बटर तुम्ही चेहऱ्याला देखील लावू शकता. आता बॉडी बटरच का आणि लोशन का वापरू नये असा प्रश्न देखील अनेकांना असेल तर बॉडी बटर हे जास्त थिड आणि क्रीमी असतं तर बॉडी लोशन हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं.
हे आहेत ते बॉडी बटर
एमकॅफिन बॉडी बटर (Mcaffeine Body Butter For Dry Skin For Women & Men)
तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही बॉडी बटरचा वापर करा. या बॉडी बटरला 4.5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. हे एक चॉकलेट फ्लेवरचं बॉडी बटर असून नैसर्गिक आहे. हे बॉडी बटर लावल्यानं तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी होतील. त्यासोबत त्वचा मॉइश्चराईज राहिल. या मॉइश्चराईजरचा वापर केल्यास तुमची त्वचा 72 तासांसाठी मॉइश्चराईज आणि हेल्दी राहिल. हे मॉइश्चराईजर नॉन स्टिकी आहे.
हेही वाचा : 18 व्या वर्षी प्रियंका चोप्रा Miss World झाली, तेव्हा निक जोनस काय करत होता माहितीये का? सासूनेच केला खुलासा
द मॉम्स (The Moms Co. Natural Body Butter)
त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हे मॉइश्चराईजर वापरू शकता. या बॉडी बटरमध्ये कोको बटर आहे. तुमच्या त्वचेला हे मॉइश्चराईजर 24 तास मॉइश्चराईज ठेवतं. त्वेचेची इलास्टिसिटी वाढते. हे बटर जर प्रेग्नंट बेलीवर लावलं तर त्वचा सॉफ्ट राहते. हे बॉडी बटर सिलिकॉन आणि क्रुएलीटी फ्री आहे. या बॉडी बटरला ऑस्ट्रेलियन एलर्जी सर्टिफिकेशन मिळालं आहे.
कोको सोल (Coco Soul Body Butter with Coconut)
या बॉडी बटरमध्ये नाराळाचे गुणधर्म आहेत. हे बॉडी बटर बनवण्यासाठी 100 टक्के विगन गोष्टींचा वापर केला आहे. हे बॉडी बटर तुमच्या त्वचेला इंटेन्स मॉइश्चराईज केलं. यात मिनरल नाहीत. डॅमेज स्किन रिपेयर करण्यात होते मदत. त्वचेला डीप हायड्रेशन करते. हे बॉडी बटर कोणत्याही स्किन टाईपचे लोक वापरू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)