`हे` महागडं पाणी आहे सेलिब्रेटींच्या फिटनेसचं रहस्य?
पण तुम्ही ऐकलंय का की ते आपल्या फिटनेससाठी सेलिब्रेटी साधं पाणी पितं नाही तर त्यांच्या पाणी हे वेगळं आणि अत्यंत महागडं असतं.
Celebs Drinking Black Water: सेलिब्रेटींमध्ये डाएटचं फॅड आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सेलिब्रेटी काय खातात आणि पितात यावर हल्ली सगळ्यांचेच लक्ष असते. सेलिब्रेटी महागडं डाएट करतात हेही आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचं जेवणही वेगळ्या प्रकारचं असतं आणि अत्यंत महागडं असतं. आपण मसालेदार पदार्थ खात असू तर सेलिब्रेटी लो कॅलरीज फूड खातात. आपण चहा - कॉफी पित असू तर सेलिब्रेटी महागडं ज्यूस वैगेरे पितात. (bollywod celebrity who drinks black water for fitness see who are they)
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
पण तुम्ही ऐकलंय का की ते आपल्या फिटनेससाठी साधं पाणी पितं नाही तर त्यांचे पाणी हे वेगळं आणि अत्यंत महागडं असतं. फिटनेस, फॅशन आणि फूडमध्ये जर का कुठला नवा ट्रेण्ड आला तर तो सेलिब्रेटींपासून सुरू होतो. जीम लुकची क्रेझ तर सेलिब्रेटींमध्ये आहेच पण त्याचसोबतच ब्लॅक अल्कलाईन वॉटर (Black Alkaine Water) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महागड्या पाण्याची क्रेझही सेलिब्रेटींमध्ये पाहायला मिळते.
गौरी खानच्या (Gauri Khan) हातात ब्लॅक वॉटरची बाटली दिसली होती. मलायका अरोराही (Malaika Arora) जीममधून बाहेर येताना ब्लॅक वॉटर हातात पकडून उभी राहिलेली पाहायला मिळाली. श्रुती हसनही (Shruti Hassan) ब्लॅक वॉटर पिते. विराट कोल्ही (Virat Kohil) तर कायमच ब्लॅक वॉटर पितो.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
काय आहे खासियत?
सामान्य RO पाण्याचा pH 6-7 असतो आणि त्यात एकही मिनिरल नसते तर ब्लॅक अल्कलाईन वॉटरचा pH 8+ असतो आणि त्यात 70 पेक्षा जास्त नॅचरल मिनिरल्स असतात. हे शरीरातील आम्ल काढून टाकते आणि हायड्रेटेड ठेवत शरीराला डिटॉक्सिफाय करते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, बहुतेक सेलिब्रिटी हेच पाणी पितात कारण ते खूप हायड्रेटिंग असते. आता ब्लॅक अल्कलाईन वॉटरचा ट्रेण्ड सगळीकडे वाढू लागला आहे.