मुंबई : हिरव्या भाज्यांमध्ये आपण दुधी भोपळ्याचीच गोष्ट घेतली तर या भाजीचं साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण असल्यानं हे सहज पचूनही जातं आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते. 


याशिवाय दुधी भोपळा पोटाच्या विकारांकरताही खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याला मंद आचेवर भाजून त्याचा भरीत बनवा. त्यातील रस पिळून काढून त्यामध्ये थोडी साखर घालून प्यायल्यामुळे लिव्हर आणि पोटाच्या विकारांवर फायदा होता. गरम पाण्यात उकळून घेतलेल्या भोपळ्याचा रायता खाल्ल्यानं अतिसारावरदेखील आराम मिळतो. 


दुधी भोपळ्याचे अनेक फायदे आहेत. मूळव्याधाच्या आजारावरदेखील दुधी उपयोगी पडतो. त्यासाठी दुधी भोपळ्याचे साल सुकवून त्याचा बारीक भुगा बनवून घ्या. आणि रोज सकाळी-सायंकाळी एक चमचा थंड पाण्यासोबत याचं सेवन करा. त्यामुळेदेखील तुम्हाला आराम मिळेल.