नाश्ताच्या वेळी या `4` चूका करणं आरोग्याला त्रासदायक
दिवसाची सुरूवात नाश्ताने केल्याने दिवसभर तुम्ही उत्साही राहता सोबतच आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.
मुंबई : दिवसाची सुरूवात नाश्ताने केल्याने दिवसभर तुम्ही उत्साही राहता सोबतच आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. नाश्ता हा गरजेचा आहे. परंतू धकाधकीच्या जीवनात अनेकजण घडाळ्याच्या काट्यासोबत धावत असतात. वेळेअभावी अनेकजण नाश्ता टाळतात. वेळात वेळ काढून तुम्ही नाश्ता केला तरीही तो करताना चूक झाल्यास आरोग्यावर त्याचे परिणाम होतात.
सकाळचा नाश्ता तुम्हाला एनर्जेटिक ठेवतो. तो टाळल्यास वजन वाढणं, हार्ट अटॅक, हृद्यविकार, मधुमेह अशा अनेक एक ना अनेक अनेक समस्या वाढू शकतात. म्हणून सकाळी कसा आणि केव्हा नाश्ता करावा याबाबतचा सल्ला नक्की जाणून घ्या. सकाळी नाश्ता न करण्याचे धोकादायक परिणाम
नाश्त्याशी संबंधित या चूका टाळा
नाश्ता टाळणं -
नाश्ता टाळल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामुळे मेटॅबॉलिझमचं कार्य बिघडतं. सोबतच यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता असते. नाश्ता केल्याने तुमच्या दिवसाची सुरूवात एनर्जेटीक होते.
कार्ब्स आणि प्रोटीन शिवाय नाश्ता -
अनेक लोकं नाश्तामध्ये कार्ब्स आणि प्रोटीन घटकांचा समावेश करत नाहीत याचा परिणाम आरोग्यावर होतो. योग्य नाश्त्यामुळे शरीरात फॅट्स न वाढता एनर्जी म्हणजेच उर्जा टिकून राहण्यास मदत होते. रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
उशीरा नाश्ता करणं -
सकाळी कधीही नाश्ता करणं आरोग्याला फायदेशीर नाही. सकाळी उठल्यानंतर तासाभरात नाश्ता करणं अपेक्षित आहे. अनेकांना सकाळी घाईत खाणं किंवा खाल्ल्यावर लगेच पडणं जमत नसल्याने उशीरा नाश्ता करण्याची सवय लागते. परिणामी आरोग्य बिघडते.
योग्य प्रमाणात नाश्ता न करणं -
नाश्ता अतिप्रमाणात किंवा अत्यल्पही करू नये. आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, सामान्यपणे नाश्त्यात एक वाटी किंवा 5-8 चमचे धान्य, 10-15 ग्राम लीन प्रोटीन आणि ग्लासभर ज्यूस असणं आवश्यक आहे.