वाढलेल्या (ब्रेस्ट) स्तनांचा आकार कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय!
वाढलेल्या स्तनांमुळे मनमोकळं वावरता येत नाही, मग नक्की करा हे घरगुती उपाय!
Breast Reduction Solution : प्रत्येक महिलेला तिचं शरीर हे सडपातळ बांध्याचं असावं असं वाटतं. त्यासोबतच स्तनसुद्धा सुडौल असावेत जेणेकरून सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मात्र वाढत्या वयानुसार शरीराची वाढ होत असताना काही महिलांच्या स्तनांचा आकार जास्त वाढतो. त्यामुळे महिला अधिकच अस्वस्थ वाटतं, कारण हवं तसं मनमोकळेपणाने वावरता येत नाही. काही महिलांचा गर्भधारणेदरम्यान स्तनांचा आकार वाढतो, जर आकार तुम्हाला कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय आहेत ज्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. (Breast Reduction Exercise and Diet informative marathi News)
महिलांच्या स्तनाचा आकार इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन या हार्मोनमुळे वाढू शकतो, त्यासोबतच अनुवांशिकतेमुळेही आकार वाढतो. तुम्ही तुमचा आहार संतुलित ठेवलात तर स्तनाची चरबी मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. त्यासोबतच आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
ग्रीन-टी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ग्रीन टीमध्ये असे अँटी-ऑक्सिडंट असतात ज्याने पचनक्रियेची गती वाढते. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होते आणि कॅलरीजही कमी होतात. तसेच स्तनामध्ये साठलेली चरबी जाळून टाकते.
शरीराचं हालचालं होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शरीराची हालचाल नाही झाली तर स्तनच नाहीतर तुमच्या शरीर अवाढव्य वाढू शकतं. स्तनाचा आकार कमी करण्यासाठी तुम्ही काही व्यायाम देखील करू शकता. स्तनांना आकार ठेवण्यासाठी पुशअप्स हा एक चांगला मार्ग आहे.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)