मुंबई : दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा म्हणून मानला जातो. याला पहिल्यांदा 1991 मध्ये साजरं करण्यात आलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याच्या निमित्ताने स्तनपानाविषयी जनजागृती करण्याचा हेतू असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईचं दूध हे बाळासाठी अमृत मानलं जातं. आईच्या दुधामुळे बाळाचं कुपोषण आणि अतिसार या गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. इतकंच नव्हे तर स्तनपानामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तसंच प्री-मोनोपॉजल गर्भाशयाचा कॅन्सरचा धोकाही कमी होतो. 


नवजात बाळासाठी स्तनपान आहे जरूरी


डॉक्टर नेहमी नवजात बालकांना आईचं दूध पाजण्याचा सल्ला देतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर नेहमी बाळाला आईचं दूध द्यावं. आईच्या दुधात अँटी-ऑक्सिडंट्स आवश्यक पोषक तत्वं आढळतात, ज्यामुळे बाळाचे संपूर्ण शरीराचा विकास होण्यास मदत होतो. आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे.


कोरोना संक्रमणादरम्यान स्तनपान देताना आईने कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.


  • बाळाला स्तनपान देण्यापूर्वी आईने हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

  • हात कमीतकमी 20 सेकंद पाण्याने धुवा.

  • सॅनिटायझरचा वापर देखील करू शकता. 

  • कोरोना संसर्ग झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच बाळाला स्तनपान द्या

  • नेहमी मास्क लावा. जेणेकरून बाळाला संक्रमणाचा धोका कमी होईल.


स्तनपानाचे होणारे फायदे


  • प्रसूतीनंतर वजन कमी होण्यास मदत होते

  • गर्भाशयाला त्याच्या पूर्वीच्या आकारात आणण्यास मदत होते. 

  • नवजात बालकाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

  • बाळाला होणाऱ्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.