Health news: स्तनपान करणाऱ्या महिलांनी चुकूनही खाऊ नयेत `हे` पदार्थ
स्तनपान करणारी आई तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर खूप लक्ष देते.
मुंबई : आईचं दूध हे लहान बाळासाठी अमृत मानलं जातं. अशावेळी स्तनपान करणारी आई तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर खूप लक्ष देते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळाला आजारांपासून दूर ठेवायचं असेल तर आईचं दूध दिलं गेलंच पाहिजे. कारण स्तनपान करताना महिलांच्या शरीरातून ऑक्सिटॉक्सिन हार्मोन स्रवलं जातं जे बालकांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. यासाठी आईने डाएटही फॉलो करणं तितकंच महत्त्वाचं असतं.
डाएट तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्तनपान करणाऱ्या काळात काही पदार्थांचं सेवन अनहेल्दी मानलं जातं. डॉ. रंजना यांनी माहिती दिलीये की स्तनपान करणाऱ्या महिलांना कोणते पदार्थ खाऊ नये.
आंबट फळं
व्हिटॅमिन सी असलेल्या लिंबूवर्गीय फळांचं सेवन स्तनपान करणार्या महिलांसाठी योग्य नाही. जेव्हा एखादी आई ही फळं खाते त्यावेळी दुधात आम्ल तयार होण्यास सुरुवात होते. हे आम्ल दुधाबरोबर मुलाच्या शरीरात जातं. परिणामी पोटदुखी, अतिसार आणि चिडचिड या तक्रारी उद्भवू शकतो.
गव्हाचं सेवन करू नये
डॉ. रंजना यांच्या सांगण्यानुसार, गव्हाचा ब्रेड खाऊ नये. कारण गव्हामध्ये ग्लूटेन नावाचं प्रथिनं असतं. जे कधीकधी नवजात मुलांसाठी नुकसानदायक ठरू शकतं. जर स्तनपान केलेल्या बाळाच्या शौचामध्ये रक्त दिसत असेल तर ते ग्लूटेन इनटॉलरेंसमुळे असू शकतं. तसेच, त्यांना ओटीपोटात वेदना देखील होऊ शकतात.
कॉफी पिऊ नये
स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कॉफी अत्यंत हानिकारक आहे. त्यात कॅफिन मुबलक प्रमाणात आढळतं, जे बाळाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात कॅफिनचं सेवन केल्याने मुलांमध्ये पोटाचा त्रास जाणवू शकतो.
लसूण खाऊ नये
स्तनपान करणाऱ्या महिलांनी लसणाचं सेवन करू नये. लसूणमध्ये एलिसीन या घटकाचा वास असतो. आई जर लसणीचं सेवन करत असेल तर हे शक्य आहे की हा वास आईच्या दुधातही आढळू शकतो. कदाचित मुलांना देखील हा वास आवडणार नाही.