सुस्मिता भदाणे, झी मीडिया,  मुंबई : मुंबईमध्ये डोळ्यांची साथ आली आहे. डोळ्यांतून पाणी येणे, लाल होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यात खुपणे अशा प्रकारच्या तक्रारीही मुंबईकरांमध्ये वाढल्या आहेत. परिणामी, खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डोळे आल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वातावरणातील वाढते प्रदूषण आणि वाढलेली उष्णता, यामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहे. धूळमाती डोळ्यांत गेल्याने जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणात होतो, अशा प्रकारच्या वातावरणामध्ये डोळ्यांना होणारा संसर्ग वेगाने वाढतो.


काही दिवसांनी संसर्ग कमी होईल, असे समजून डोळ्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र अशा समजुतीमध्ये राहून स्वतःच कोणतीही औषधे, ड्रॉप्स डोळ्यात टाकू नयेत, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असल्याचं सांगण्यात येत आहे.


डोळ्याच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका, यासाठी नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डोळ्यातील लालसरपणा, सुज येणे, खाज येणे तसेच पाणी येण्याची तीव्रता अधिक असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


वाढलेले प्रदूषण बांधकाम आणि ट्रॅफिक, सतत एसीमध्ये राहणे यामुळेदे खील डोळे कोरडे पडून ॲलर्जी होते, बाहेर पडताना आणि एसी मध्येअसताना डोळे उघड झाप करणं गरजेचं आहे. सतत मोबाईल, कम्प्युटरसमोरही डोळ्यांची उघडझाप कमी होते, त्यामुळे थोडावेळ थांबून डोळ्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे.