Calcium Rich Food : या 3 गोष्टींमधून मिळते भरपूर कॅल्शिअम, हाडांचा त्रास होणार कमी
कॅल्शिअमची कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
Calcium Rich Food : तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ नये त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या शरीरात अनेक गोष्टींची कमतरता असते. ही कमतरता काही गोष्टींद्वारे भरून काढली जाऊ शकते. काही लोक त्यांच्या हाडांमध्ये खूप दुखत असल्याची तक्रार करतात. वास्तविक, यामागचे एक कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता.
कोणत्या तीन गोष्टी आहेत, ज्याद्वारे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर केली जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही आजाराला बळी पडू नये म्हणून स्वतः न्यूट्रिशन एक्सपर्ट 'निखिल वत्स' यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
चिया सीड्समध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम
न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्या मते चियाच्या बिया खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरुन निघते. या बिया कसे खावे याचे वर्णन करताना वत्स म्हणाले की चिया बियांमध्ये एका ग्लास दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. याशिवाय यात ओमेगा देखील असते. म्हणजेच जे दूध पीत नाहीत ते हे सेवन करू शकतात. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही.
चीजमध्येही भरपूर कॅल्शियम
चीज खाल्ल्याने तुमच्या शरीरात भरपूर कॅल्शियम मिळेल, न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी याविषयी बोलताना सांगितले की, यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते आणि त्यात व्हिटॅमिन-डीही असते. म्हणजेच कॅल्शियमचाही तो चांगला स्रोत आहे.
बदाम
फार कमी लोकांना माहित असेल की बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल यांनी सांगितले की, बदाम या ड्रायफ्रूटचे सेवन केल्यानेही शरीरात कॅल्शियमचे प्रमाण चांगले राहते. जर तुम्ही रोज मूठभर बदाम खाल्ले तर तुमच्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळेल. बदाम भिजवून खाल्याने खूप फायदा होतो.