Changes in Nails Cancer Risk Symptoms :  देशभरात कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात दररोज 333 कर्करोग रुग्णांची नोंद होते. कॅन्सरवर मात करण्यासाठी जगभरात रिसर्च सुरु आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. या कर्करोगाचे लक्षणंही शरीरिरात दिसतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या शास्त्रज्ञांने असा शोध लावला आहे की, नखांची स्थिती तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला कर्करोगाने गाठलंय की नाही. तुमच्या नखाचा रंग बदलल्यास तुम्हाला कर्करोग आहे की नाही, याचं निदान होतं. हा शोध अमेरिकेतील संशोधकांनी लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, नखे विकृतींच्या उपस्थितीमुळे दुर्मिळ आनुवंशिक विकाराचे निदान होतं. अस्तरांच्या ऊतींमध्ये कर्करोगाच्या ट्यूमर विकसित होण्याचा धोका वाढतो, असं त्यांचं म्हणणं आहे. नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा असं म्हटलं जातं. यात नखे आकाराने मोठी होता आणि नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली जाते. 


प्रीडिस्पोझिशन सिंड्रोम म्हणजे काय?


BAP1 हे ट्यूमर प्रीडिस्पोझिशन सिंड्रोम म्हणून ओखळलं जातं. ही स्थिती जीन उत्परिवर्तनामुळे उद्भवते आणि जे सहसा ट्यूमर दाबण्याचे काम करतं असं शास्त्रज्ञ सांगतात. NIH क्लिनिकल सेंटरमध्ये BAP 1 प्रकाराचे स्क्रीनिंग करण्यात अलं असून यातून शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. 


दीड ते दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ प्रयोगाच्या परिणामांचे निरीक्षण केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष समोर आणले आहेत. त्यांनी 35 कुटुंबांमधील ट्यूमर प्रीडिस्पोझिशन सिंड्रोम असलेल्या 47 व्यक्तींमध्ये BAP1 असल्याच निदान झालं आहे. 


हेसुद्धा वाचा - 'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत


अलेक्झांड्रा लेबेन्सन एमएस, संशोधन संघाच्या प्रमुख लेखिका आणि अनुवांशिक सल्लागार सांगतात की, बेसलाइन अनुवांशिक मूल्यांकनादरम्यान नखांच्या आरोग्याबद्दल विचार झाला असता. एका रुग्णाने नोंदवले की तिला तिच्या नखांमध्ये सूक्ष्म बदल आढळून आले. यानंतरच इतर सहभागींचे नखे बदलांसाठी मूल्यांकन करण्यात आले. मग काही नखांच्या बायोप्सी केल्या, जात त्यांना ट्यूमर असल्याच समोर आलं. ज्याला onychopapilloma असं म्हणतात. 
Onychopapilloma मुळे नखेच्या लांबीच्या बाजूने रंगीत रेषा निर्माण होतात. हे सहसा पांढरे किंवा लाल रंगाचे असून सर्व रंग बदलण्यावर तसच घनता आणि क्षय यावर ते अवलंबून असतात. 


हेसुद्धा वाचा - Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अ‍ॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी


शिवाय BAP1 ट्यूमर प्रीडिस्पोझिशन सिंड्रोम असलेल्या 30 आणि त्याहून अधिक वयोगटातील 88 टक्के अभ्यास सहभागींना एकाधिक नखांवर ऑन्कोपापिलोमा ट्यूमर असल्याच समोर आलं. मेलेनोमा आणि इतर BAP1-संबंधित घातक रोगांचा वैयक्तिक किंवा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः महत्त्वाचं असतं असं संशोधनातून सिद्ध झालंय. 


बीएपी1 जनुकातील उत्परिवर्तन सिंड्रोमच्या वाढीसाठी मदत करत त्यामुळे कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतात. कर्करोग ही जागतिक स्तरावर वाढत असलेल्या गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक असून यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कॅन्सर होतो. त्यामुळे आपल्या शरीरातील बदलांकडे आणि लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञ सांगतात. 


 
(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)