रात्री झोप येत नाही? मग करा `हे` सोपे योगासनं, निद्रानाश होईल दूर
रोजच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणावाने अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर रोज रात्री काही सोपे योगासनं केले तर निद्रानाशाची समस्या जाणवत नाही.
बदलतं वातावरण आणि वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. मात्र याच सामान्य व्याधी आता मानसिक आरोग्य खराब होण्यामागचं कारण ठरत आहेत हे सिद्ध होत आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचा वैयक्तिक संघर्ष सुरु आहे. बदलती जीवनशैली आणि फास्टफुडचा विपरित परिणाम हा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यावर ही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन ते चार वर्षांत मानसिक समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मानसिक ताण तणाव वाढला की, त्याचा परिणाम शरीरावर देखील जाणवतो. वेळेत न जेवणं, जेवताना खाण्याकडे लक्ष न देणं यामुळे शरीराच्या वाढीसाठी हवे असलेले आवश्यक घटक अंगी लागत नाही. बऱ्याच जणांना तणावामध्ये असल्यावर जेवण जात नाही. जरा काही खाल्लं तरी उलट्या होतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा परिणाम म्हणजे शरीराला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. या सगळ्याचा परिणाम झोपेवर देखील होतो म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी योगा केल्याने ताण तणाव दूर होतो.
योगा शरीर आणि मनाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी साधे सोपे योगा केले तर तुम्हाला रात्री निद्रानाशाचा त्रास जावणार नाही. बऱ्याच जणांना रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते.त्यामुळे झोप अपुर्ण होते, याचा परिणाम शरीरावर होतो.
बालासन
रोज झोपण्यापूर्वी बालासन १ ते ३ मिनिटे करावा. यामुळे मांड्या आणि पायाच्या टाचा आणि बोटांमध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते. जर तुम्हाला ही निद्रानाश होण्याचा आजार असेल तर रोज झोपण्यापूर्वी 2 ते 3 मिनिट तुम्ही बलासन करु शकता.
बद्ध कोणासन
ऑफिसमध्ये किंवा प्रवासात खूप वेळ बसून राहिल्याने पाय जखडतात, त्यामुळे रोज रात्री झोपताना 'बद्धकोणासन' तुम्ही करु शकता. यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होतात. रात्री शांत झोप लागते.
भुजंगासन
'भुजंगासना'मुळे हाडांची लवचतिकता वाढते. या आसनामुळे पोटावर ताण येतो. त्याचबरोबर तणाव देखील दूर होतो.
शवासन
'शवासन' रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही बेडवर करु शकता. शवासनामुळे मनाचा ताण हलका होतो. तसंच मेंदू शांत राहण्यास देखील मदत होते.शवासन केल्याने रात्री चांगली झोप लागते.