मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यामुळे गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. स्त्रियांमध्ये गुडघ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात अढळतात. मानवी शरीराच्या एकूणच हालचालींमध्ये सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे गुडघ्याचा सांधा असतो. रोजच्या कामकाजामुळे आणि वयोमानाप्रमाणे गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या दोन हाडातील कुर्चा झिजून गेल्यामुळे हाडांतील घर्षण वाढतं. त्यामुळे गुडघेदुखीला सुरुवात होते. अशावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ  हेच मार्ग राहतात. पण गुडघेदुखीवर 'एरंडेल तेलाचा' वापर अधिक फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर काही टिप्स सुद्धा फायदेशीर ठरू शकतात.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरंडेल तेल खरंच गुणकारी आहे का ?
गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण आहे. एरंडेल तेलातील वेदनाशामक गुण गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात. एंरडेल तेलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अ‍ॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेत 'एरंडेल तेल' सतत मुरल्याने स्नायूंना आलेली सूज व नसा मोकळ्या होतात.
 
काही टिप्स
- गुडघ्यांच्या दुखण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी रोज कोमट पाण्याने अंघोळ करा.
- सात्विक, संतुलित आहार घ्या.
- फास्ट फूट शक्यतो टाळा. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी वाढणार नाही.
- दिवसातून एकदा कमीत कमी १५ मिनिटे गरम पाण्यात पाय बुडवून बसा. यावेळेस तुमच्या पायांना हवा लागणार नाही याची काळजी घ्या.
- ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये ५ मिनीटे तरी चाला किंवा फिरा.
- ऑफिसमध्ये काम करताना मध्ये-मध्ये पाय स्ट्रेच करा.