Cure of Diabetes:आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. सध्या  देशात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरुण , वृद्धांसह सर्व वयोगटातील लोक त्याला डायबिटीजला बळी पडत आहेत. प्री-डायबिटीजचा टप्पा कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो. 


ही लक्षणे देतात धोक्याचे संकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्कर येणे आणि घाम येणे ही मधुमेहापूर्वीची (Diabetes)लक्षणे असू शकतात. या आजारात शरीरातील तापमान बरोबर ठेवणे कठीण जाते. मधुमेहामुळे शरीराचे तापमान नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थित राखता येत नाही.  याशिवाय जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे ही देखील मधुमेहाची (Diabetes) लक्षणे असू शकतात. मात्र, मधुमेह होण्यापूर्वी शरीरातील लक्षणे ओळखणे कठीण असते. साखरेची पातळी वाढल्याने प्री-डायबेटिसचा धोकाही वाढू शकतो. पण त्यावर इलाज आहे. दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि बदल केले तर तो बरा होऊ शकतो आणि हृदयविकाराचा धोकाही टाळता येऊ शकतो. 


जास्त वजन वाढले तर...


प्री-डायबिटीज विविध कारणांमुळे होऊ शकतो. हे लठ्ठपणा, वाईट जीवनशैली आहेत. प्री-डायबिटीजमुळे पाय सुन्न होणे, उलट्या होणे, घाम येणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. प्री-डायबिटीजची लक्षणे दिसू लागल्यास वजन नियंत्रणात ठेवावे. जास्त वजनामुळे तुम्हाला हृदय, कर्करोग, हार्ट स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.


काय करायचं?


जर महिलांच्या कंबरेचा आकार 35 पेक्षा जास्त आणि पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 पेक्षा जास्त असेल तर ही देखील प्री-डायबेटिसची लक्षणे असू शकतात. यासाठी रोज किमान 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे. रोज चालण्याने तुमचे आरोग्य तर सुधारेलच शिवाय तुमचे वजनही नियंत्रणात राहील. याशिवाय उच्च फायबरयुक्त आहार घ्या. यासाठी तुम्ही रास्पबेरी खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय जेवणात कोबी, लेट्युस आणि गाजर घ्या. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)