मुंबई : हिवाळ्यात लोकांची सांधेदुखीची समस्या वाढते. या ऋतूमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही आणि शरीराच्या पुढील भागात रक्ताचा प्रवाह खूपच कमी होतो. हेच कारण आहे की हिवाळ्याच्या हंगामात अगदी लहान दुखापतीमुळे जास्त वेदना होऊ शकतात. बॅरोमेट्रिक प्रेशरमधील बदलामुळे सांध्यांना सूज येऊ शकते. जास्त तळलेले पदार्थ खाणे, व्यायाम न करणे आणि डिहायड्रेशनमुळे हा त्रास आणखी वाढतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे लोकांना या यासंबंधीत अनेक प्रश्न पडताता, जसे की हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम कसा मिळेल? काय खाल्ल्याने सांधेदुखी बरी होईल? हिवाळ्यात सांधेदुखी कशी टाळायची? तर तुम्हाला पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या लेखात मिळतील.


खरतेर हिवाळ्यात शरीर हृदयाजवळील रक्त उबदार ठेवायचे काम करत असते, ज्यामुळे जॉईंट्समध्ये रक्ताचं सर्कुलेशन फार कमी होतं. त्यामुळे सांध्यांमध्ये जास्त वेदना जाणवतात. ज्या लोकांना ऑर्थोपेडिक दुखापत, फ्रॅक्चर किंवा काही त्रास झाला होता, त्यांना सांधेदुखीचा धोका जास्त असतो.


1. नसा खेचल्या सारखे वाटणे


वातावरणाचा दाब म्हणजे पाऊस आणि हिवाळ्यात वातावरणाचा दाब कमी होतो. त्यामुळे सांध्यांना सूज येऊ लागते. यामध्ये घोटा, गुडघा, नितंब, पाठीचा कणा, बोटे किंवा शरीराचा कोणताही भाग असू शकतो. कधीकधी ही जळजळ आंतरिक असते. त्यामुळे सूज आल्याने शिरांवर ताण येतो आणि ते दुखू लागतात.


2. सांध्याचा त्रास


तुम्ही हे ऐकलं असेल की, गोष्टी उष्णतेमध्ये विस्तारतात आणि थंडीत संकुचित होतात. जीवनशैली बैठी असेल तर थंडीचा परिणाम सांध्यांवर अधिक होतो. पेशी आणि स्नायू संकुचित होऊ लागतात. सांधे जड होतात. त्यांची लवचिकता कमी होते.


3. कमी ऑक्सिजन प्राप्त होणे


हिवाळ्यात, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सामान्यपणे वाहू शकत नाही. शरीराच्या विविध भागांना रक्त, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. याचे कारण असे की रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते, जे ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते.


दुसरी काही कारणे


- सांध्यांवर युरिक ऍसिड जमा होणे.
-कधीकधी अनुवांशिक कारणांमुळे देखील सांधे दुखतात.
-अशक्तपणामुळे देखील वेदना होतात.
- शिळे अन्न खाणे, अपचन, तणाव ही सांधे दुखीचीप्रमुख कारणे आहेत.


हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टी खा.


-अन्नामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे शरीर उबदार राहते आणि वजन वाढू देत नाही. वजन वाढल्याने सांध्यांवर अधिक दबाव येतो.


-मसाल्यांमध्ये काळी मिरी, हळद, मसूर, साखर शरीराला उबदार ठेवते. अक्रोड, पिस्ता, काजू, बेदाणे, शेंगदाणे आणि बदाम मिसळून मूठभर ड्रायफ्रूट्स खाणे देखील फायदेशीर ठरू शकते.


-आंबा, संत्रा, टेंजेरिन आणि ब्रोकोली यांसारखी हंगामी फळे, हिरव्या भाज्या किंवा पालक खाव्यात. ज्यामुळे आराम मिळू शकतो.


-सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात घ्या. संत्री, पालक, कोबी आणि टोमॅटो खाल्ल्यानेही आराम मिळतो.


-रोज गूळ खा. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.


-खजूरमध्ये अ आणि ब जीवनसत्त्वांव्यतिरिक्त पोटॅशियम, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. याचे सेवन करणेही फायदेशीर ठरू शकते.


आरोग्याची अशी काळजी घ्या


भरपूर पाणी प्या आणि वजन न वाढवणारे व्यायाम आणि स्ट्रेचिंग करून सांधे सक्रिय ठेवा. हा आजार लहान वयातच आढळून आल्यास तो औषधाने लवकर बरा होऊ शकतो.