Increase Sperm Count Naturally : शुक्राणूंची सतत घटणारी संख्या ही अत्यंत चिंतेची बाब आहे. शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. आजकालचा लोकांचा आहार आणि जीवनशैली हे शुक्राणू कमी होण्याचं कारण असल्याचं सांगितलं जाते. वंध्यत्वाची समस्या केवळ महिलांशी जोडून पाहिली जाते, जे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलांना जन्म न देण्यामागे पुरुषांची कमजोरी हेही एक प्रमुख कारण असू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे असू शकतात 'ही' कारणे
कधी कधी खेळताना किंवा अपघातात पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत होते आणि याचा थेट परिणाम शुक्राणूंच्या संख्येवर होतो. अनेक वेळा चुकीच्या शस्त्रक्रिया आणि मधुमेहाच्या आजारामुळे शुक्राणूंच्या संख्येतही घट होते. शरीरात शुक्राणूंच्या कमतरतेचे आणखी एक प्रमुख कारण आनुवंशिकता देखील असू शकते. 


कोणत्याही जुन्या आजारामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्याही दिसून येते. हार्मोनल असंतुलन हे देखील पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. कर्करोगादरम्यान केमोथेरपीमुळे शुक्राणूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते. जे लोक पिझ्झा, फ्राईज, मिठाई, सोडा आणि रेड मीट सारखे पाश्चिमात्य पदार्थ जास्त खातात त्यांच्या शुक्राणूंची संख्या सामान्यपेक्षा कमी असते.


स्पर्म काउंट असा वाढवा
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. ज्यांना पाश्चिमात्य पदार्थ खायचं वेड आहे त्यांनी ते आहारातून वगळावं. तुम्हाला दारू आणि सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बंद करा. तुम्ही नियमित व्यायाम करा आणि तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर रहा. 


तुमच्या आहारात मसूर डाळीचा समावेश करा कारण मसूर डाळीमध्ये असलेले फॉलिक ॲसिड पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवते. अश्वगंधाचं सेवन करा आणि झिंकचं प्रमाण वाढवा. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तज्ज्ञ ड्रायफ्रुट्स, हिरव्या भाज्या आणि डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. योग आणि ध्यानानेही तुमची शुक्राणूंची संख्या वाढवण्यास तुम्हाला होऊ शकते. 
तज्ज्ञांच्या मते, निरोगी पुरुषामध्ये सरासरी 43 दशलक्ष शुक्राणूंची संख्या असणे आवश्यक आहे.


 (Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)